कोलकाता आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी नेत्रदीपक कामगिरी करत फलंदाजांना चांगलंच बांधून ठेवलं. विशेष म्हणजे मुंबई संघाकडून जसप्रित बुमराह आणि कोलकाता संघाकडून पॅट कमिन्स या गोलंदाजांनी उल्लेखनीय अशी गोलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी एकाच षटकात विरोधी संघाच्या तीन फलंदाजांना बाद केलं.

हेही वाचा >>>> …W,0,W,W,0,0! जसप्रित बुमराहसमोर केकेआरचे लोंटागण; केलं पाच फलंदाजांना बाद

बुमराहने सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता संघाच्या एकूण पाच फलंदाजांना तंबुत पाठवलं. बुमराहने नितीश राणा आणि आंद्रे रसेल या दोन घातक फलंदाजांना बाद केलं. याव्यतिरिक्त सतराव्या षटकात त्याने शेल्डन जॅक्सन (५), पॅट कमिन्स (०), आणि सुनिल नरेन (०) या आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवलं. त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाता संघ खिळखिळा झाला. परिणामी केकेआर संघ १६५ धावा करु शकला.

हेही वाचा >>>> मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर

तर दुसरीकडे कोलकाता संघातील पॅट कमिन्सदेखील बुमराहसारखीच कामगिरी करुन दाखवली. १४ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या इशान किशनला त्यांन झेलबाद केलं. त्यानंतर याच षटकात त्याने डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन या शेवटच्या फळीतील फलंदाजांना तंबुत पाठवलं. पॅट कमिन्सने बुमराहसारखीच कामगिरी केल्यामुळे मुंबईचा संघ ढसळला.

हेही वाचा >>>> दोन वेळा विजय, 2 वेळा फायनल; जाणून घ्या हिरव्या रंगाची जर्सी आणि RCBचं खास कनेक्शन

परिणामी कोलकाताने मुंबईला ५२ धावांनी पराभूत केलं. पॅट कमिन्सने एकूण तीन तर आंद्रे रसेलने दोन विकेट्स घेतल्या.