Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Score Updates : आयपीएल २०२३ चा १३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. सुनील नारायणने ऋद्धीमान साहाला १७ धावांवर बाद केल्यानंतर शुबमन गिलने गुजरातचा डाव सावरला.

साई सुदर्शननेही अप्रतिम फलंदाजी करत गुजरातच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. साई सुदर्शनने ३८ चेंडूत ५३ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. पण विजय शंकरने कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २४ चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे गुजरात टायटन्सने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २०४ धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताला विजयासाठी २० षटकांत २०५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
CSK vs KKR Live Cricket Score Updates in Marathi
IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी

कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने गुजरात टायटन्सचे महत्वाचे फलंदाज बाद केले. सुनीलने ऋद्धीमान साहाला स्वस्ता माघारी पाठवला. साहा १७ धावांवर असताना झेलबाद झाला. तसंच सुनीलने अर्धशतक ठोकणाऱ्या सुदर्शनाही ५८ धावांवर बाद केलं. त्यानंतर सुयश शर्माच्या गोलंदाजीवर अभिनव मनोहर १४ धावांवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर गुजरातसाठी सावध खेळी करणाऱ्या शुबमनही ३७ धावांवर सुनीलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. सुनील नारायणने ४ षटकांत ३३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या.