KKR Shares Post For Yash Dayal : कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगतदार सामना झाला. आयपीएल २०२३ चा १३ वा सामना लीगच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांमध्ये सामील झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरातने ४ विकेट्स गमावत २०४ धावा केल्या होत्या. त्यामुळे कोलकाताला विजयासाठी २०५ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताला सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. पण अखेरच्या षटकात रिंकू सिंगने धावांचा पाऊस पाडला अन् कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. शेवटच्या पाच चेंडूत २८ धावांची गरज असताना रिंकूने पाच चेंडूत पाच षटकार ठोकले अन् आख्ख्या स्टेडियममध्ये सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

कोलकाताला शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती. गुजरातसाठी यश दयालने शेवटचं षटक फेकलं. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १ धाव काढली आणि रिंकू सिंग स्ट्राईकवर आला. त्यानंतर रिंकूने शेवटच्या पाचही चेंडूवर षटकार ठोकले आणि यश दयालला धक्का दिला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत यश दयालचं समर्थन करून त्याला चॅम्पियन बनवलं.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

नक्की वाचा – Video : रिंकूच्या पराक्रमाची चंद्रकांत पंडितांनी केली शास्त्री, मियाँदादच्या षटकारांशी तुलना

कोलकाताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत यश दयालचा आत्मविश्वास वाढवत म्हटलं, ताठ मानेनं राह, हा एक खराब दिवस होता. प्रत्येक स्टार खेळाडूच्या आयुष्यात अशाप्रकारचा खराब दिवस आलेला आहे. तू एक चॅम्पियन आहेस. यश दयाल दमदार पुनरागमन करणार. कोलकाता नाईट रायडर्सच्या या पोस्टने तमाम चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे. यश दयालच्या नावावर या सामन्यात एका अनोख्या विक्रमाचीही नोंद झाली. यश दयाले चार षटकांत ६९ धावा दिल्या. यामध्ये त्याला एकही विकेट मिळव्यात यश आलं नाही. आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा देण्याच्या लिस्टमध्ये यश दयाल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर बासिल थंपी आहे. ज्याने २०१८ मध्ये हैद्राबादविरोधात चार षटकांत ७० धावा दिल्या होत्या.