scorecardresearch

Premium

स्टेडियममधील डासांशी लढण्यापासून ते ५ स्टार हॉटेलमध्ये राहण्यापर्यंत; IPLने ग्राउंड्समनचं ‘असं’ बदलले आयुष्य

आयपीलने अनेक खेळाडूंचे जीवन बदलले पण आता हेच मैदानावर मेहनत करणाऱ्या सपोर्ट स्टाफचही झालं आहे.

TATA IPL 2022
फोटो: Indian Express

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) ने केवळ खेळाडूंचेच नाही तर मैदानावरील खेळाडूंचेही आयुष्य बदलून टाकले आहे. आता केवळ खेळाडूंना पंचतारांकित हॉटेलची सुविधा मिळत नाही, तर मैदानावर मेहनत करणारे सपोर्ट स्टाफही आलिशान हॉटेलमध्ये राहत आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे ५७ वर्षीय ग्राउंड्समन वसंत मोहिते यांचे आयुष्यही आयपीएलच्या १५ व्या हंगामात बदलले आहे. मोहिते यांचे समुद्राजवळील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य हे स्वप्न पूर्ण झाले आहे.

आयपीएल २०२२ मध्ये कॅडबरी कंपनीने ग्राउंड स्टाफचा सन्मान करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वसंत मोहिते यांना सेलिब्रिटी डिझायनर मसाबा यांनी डिझाइन केलेला ड्रेस, उत्तम जेवण आणि बसची सुविधाही देण्यात आली आहे. आपल्या बदललेल्या आयुष्याविषयी बोलताना मोहित सांगतात, सीझनच्या सुरुवातीला त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहावे लागेल अशी भीती वाटत होती. याची त्याला खात्रीही नव्हती.

disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
Man holds were hiring placard during football match in Bengaluru
बंगळुरूमध्ये फुटबॉल मॅचमदरम्यान विचित्र पोस्टर झालं व्हायरल; नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
Pickpocketing video goes viral
भर गर्दीत बसमध्ये चढताना चोरट्याने साधला डाव, पाकिटमारीचा VIDEO होतोय व्हायरल
vijay sales flipkart apple stores discount iphone 15 series
iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ठिकाणी सुरू आहेत बेस्ट ऑफर्स; एकदा पाहाच

(हे ही वाचा: Photos: …जेव्हा IPL मध्ये वयाच्या ४१व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेंवर आणली होती बंदी)

‘मला डासांमुळे झोप येत नव्हती, घरीही जाता येत नव्हते’

वसंत आठवणी सांगत म्हणाले की, पूर्वीचे वातावरण किती वेगळे आणि कठीण होते. पहिले सामने अनेकदा उशिरा संपायचे. सामना संपल्यानंतरही आमची शिफ्ट सुरू होते. मला घरी जात येत नसे. त्यामुळे स्टेडियममध्येच एका छोट्या खोलीत रात्र काढत असे, जिथे डासांमुळे झोपणे कठीण होते. रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने सामना संपल्यानंतर आम्ही कुठेही जाऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जमिनीवर झोपायचो. सामना नसला तरी सकाळी ९ वाजता स्टेडियम गाठायचे होते. मग फक्त संध्याकाळी ६ वाजता मोकळा वेळ मिळायचा. सामन्याच्या दिवशी लवकर येऊन उशिरापर्यंत काम करावे लागते. यासाठी एमसीए त्यांना यासाठी दुप्पट पैसे देतात.”

(हे ही वाचा: IPL 2022: रॉयल कारभार! कोणता संघ कोणत्या हॉटेलमध्ये राहतोय? पहा Photo)

पंचतारांकित हॉटेल्समधली झोप

आपल्या नवीन आव्हानांबद्दल बोलताना वसंत मोहिते सांगतात, “आता मला पंचतारांकित हॉटेलमध्ये वेगळीच चिंता आहे. दिव्याचा स्विच शोधणे कठीण होते. मला दिवा कसा लावायचा हे देखील कळत नाही पण पलंग मऊ असल्यामुळे छान झोपतो.” त्याचा सहकारी ग्राउंड्समन नितीन मोहिते म्हणतात की ड्रेसिंग रूममध्ये जाणे आता वेगळे आहे. घेऊन जाण्यासाठी आणि सोडण्यासाठी बस येते. यासाठी आम्ही फक्त धन्यवाद म्हणू शकतो.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life changes for wankhede groundsmen from fighting mosquitoes at stadium to five star hotel comfort ttg

First published on: 06-04-2022 at 16:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×