लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (LSG CEO) रघू अय्यर यांच्या गाडीला अपघात झाला. यात तिघे जण जखमी झाले आहेत. यात स्वतः रघू अय्यर, गौतम गंभीरचा सहकारी आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. रघू अय्यर शुक्रवारी (२९ एप्रिल) पुण्यात होणाऱ्या सामन्यासाठी एलएसजी संघासह मुंबईहून पुण्याला जात होते. यावेळी हा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखनऊ संघाचे सीईओ रघू अय्यर पुण्यातील आयपीएल सामन्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून पुण्याला चालले होते. यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये लखनऊचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अन्य एक व्यक्ती होती. यात अपघातात तिघेही जखमी झाले असले, तरी तिघेही सुरक्षित आहेत.

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा (IPL 2022) ४२ व्या सामना लखनऊ सुपरजायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्जमध्ये (PBKS) पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वातील पंजाबने आपल्या संघाच्या प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे लखनऊच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मनीष पांडेच्या जागेवर आवेश खानला पुन्हा संधी देण्यात आलीय.

पंजाबने आतापर्यंत आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात ८ सामने खेळले. यापैकी पंजाबने ४ सामने जिंकले, तर ४ सामन्यांमध्ये पराभव पत्करला. सध्या गुणतालिकेत पंजाब ८ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे लखनऊने आतापर्यंत ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत, तर ३ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला. लखनऊ गुणतालिकेत १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा : IPL 2022, PBKS vs LSG : पंजाबकडून २० षटकात ८ बाद १५३ धावा, लखनऊला विजयासाठी १५४ धावांचं आव्हान

विशेष म्हणजे हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्जने मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं होतं. लखनऊ सुपर जायंट्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lsg ceo raghuram iyer injured in road accident while traveling to pune from mumbai pbs
First published on: 29-04-2022 at 21:11 IST