Premium

MI vs LSG Eliminator: आला रे! एमआय पलटणचा डंका, मुंबईचा लखनऊवर ८१ धावांनी दणदणीत विजय

LSG vs MI Score Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८१ धावांनी शानदार विजय मिळवला. या पराभवामुळे लखनऊचा आयपीएल २०२३मधील प्रवास संपला आहे.

LSG vs MI Highlights: Mumbai Indians make it to the second qualifier beat Lucknow by 81 runs in the Eliminator match
मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला. सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

MI vs LSG IPL 2023 Eliminator: आयपीएल २०२३च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १८२ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनऊचा संघ केवळ १०१ धावाच करू शकला. या पराभवामुळे लखनऊचा आयपीएल २०२३मधील प्रवास संपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू हंगामात बुधवारी झालेल्या एलिमिनेशन सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर-२ मध्ये स्थान पक्के केले. आता २६ मे रोजी जगातील सर्वात मोठे स्टेडियम, अहमदाबाद, मुंबई येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गतविजेत्याचा सामना होणार आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या आणि मुंबईला १८३ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १६.३ षटकात १०१ धावांवर सर्वबाद झाला. लखनऊचा संघ सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पराभूत होऊन बाहेर पडला. त्याचवेळी मुंबईने लखनऊच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला. सलग तीन पराभवानंतर मुंबईचा लखनऊ विरुद्धचा हा पहिला विजय आहे.

लखनऊने अवघ्या ३२ धावांत ७ गडी गमावले

प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६.३ षटकात १०१ धावांवर सर्वबाद झाला. २५ धावांच्या आतच संघाचे दोन्ही सलामीवीर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. इम्पॅक्ट खेळाडू काईल मेयर्स १८ धावा आणि प्रेरक मांकड ३ धावा करून बाद झाला. क्रुणाल पांड्यालाही मोठी खेळी खेळता आली नाही. तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. यानंतर आयुष बदोनीलाही संघासाठी मोठी खेळी करता आली नाही. तो केवळ १ धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. निकोलस पूरन गोल्डन डक बनला. लखनऊकडून धडाकेबाज खेळी करणारा मार्कस स्टॉयनिस धावबाद झाला. त्याने २७ चेंडूत सर्वाधिक ४० धावा केल्या. यानंतर कृष्णप्पा गौतमही धावबाद झाला. रवी बिश्नोईलाही काही विशेष कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या 3 धावांवर बाद झाला. यानंतर दीपक हुडाही धावबाद झाला. १३ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करून तो बाद झाला. यानंतर लखनऊच्या विकेट्स ठराविक अंतरानंतर विकेट्स पडत राहिल्या. मुंबईच्या आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. आकाशने १.४२ च्या स्ट्राइक रेटने ३.३ षटकात केवळ ५ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.

हेही वाचा: IPL2023: “आजच्या क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडूच असे वागत असल्यास…”, कोहली-गौतम वादावर कपिल देव यांचे गंभीर भाष्य

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. मात्र, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांच्या उपयुक्त खेळींनी मुंबईची धावसंख्या १८० धावांच्या पुढे नेली. लखनऊकडून नवीन-उल-हकने चार बळी घेत मुंबईला २०० धावांचा टप्पा पार करण्यापासून रोखले. यश ठाकूरला तीन आणि मोहसीन खानला एक विकेट मिळाली. या सामन्यातील पराभवाने लखनौचे प्लेऑफमध्ये पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले. या संघाने गेल्या वर्षी एलिमिनेटर सामनाही खेळला होता आणि त्यात पराभव झाला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lsg vs mi highlights mumbai indians make it to the second qualifier beat lucknow by 81 runs in the eliminator match avw

Next Story
मुंबई इंडियन्सच्या नेहल वढेराने यश ठाकूरला धुतलं, शेवटच्या षटकात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, पाहा video