Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL Latest Update: आयपीएल २०२३च्या ४३व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. लखनऊचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून बंगळुरूचा संघ सहाव्या स्थानावर आहे. लखनऊ सुपर जायंट्सने कसून गोलंदाजी करत आरसीबीला मोठी धावा करण्यापासून रोखले. बंगळुरूने जायंट्ससमोर १२७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

लखनऊने गेल्या सामन्यात बंगळुरूचा पराभव केला. फाफ डुप्लेसिसचा संघ या सामन्यात बदला घेण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांचा तो निर्णय त्यांच्याच फलंदाजांनी चुकीचा ठरवला. निर्धारित २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १२६ धावा केल्या. लखनऊच्या फिरकी गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना आपल्या तालावर अक्षरशः नाचवले असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बंगळुरूची सुरुवात चांगली झाली होती. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली या दोन्ही सलामीवीरांनी उचलला. ८.२ षटकात त्यांनी ६२ धावांची दमदार सलामी भागीदारी केली. मात्र, त्यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

विराट कोहलीने ३० चेंडूत ३१ धावा केल्या आणि तो मोठा रवी बिश्नोईच्या गुगली चेंडूवर यष्टीचीत झाला. सर्वाधिक धावा आरसीबीकडून कर्णधार फाफने केल्या. त्याने ४० चेंडूत ४४ धावा केल्या. बाकी एकाही खेळाडूला दोन आकडी संख्या देखील गाठता आली नाही. यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर कृष्णप्पा गौतमने अनुज रावतला (९) बाद केले. ग्लेन मॅक्सवेलला बिश्नोई एलबीडब्ल्यू. त्याला चार धावा करता आल्या. त्यानंतर अमित मिश्राने कर्णधार फाफ डुप्लेसिस (४४धावा) आणि सुयश प्रभुदेसाई यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

महिपाल लोमर तीन धावा, कर्ण शर्मा दोन धावा, मोहम्मद सिराज खाते न उघडता बाद झाले. नवीन-उल-हकने तिघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ११ चेंडूत १६ धावा करून दिनेश कार्तिक धावबाद झाला. त्याचवेळी वनिंदू हसरंगा ८ धावा करून नाबाद राहिला. लखनऊकडून नवीन-उल-हकने ३ विकेट्स घेतले. रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्याला मदत केली.

हेही वाचा: LSG vs RCB Match: WTC पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! लखनऊच्या सामन्यादरम्यान के.एल. राहुल दुखापतग्रस्त झाल्याने सोडले मैदान, पाहा Video

हे दोन्ही संघ आहेत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.

बंगळुरूचे इम्पॅक्ट खेळाडू: हर्षल पटेल, शाहबाज अहमद, विजयकुमार वैशाक, मायकेल ब्रेसवेल आणि सोनू यादव.

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, यश ठाकूर.

लखनऊचे इम्पॅक्ट खेळाडू: आयुष बडोनी, डॅनियल सायम्स, आवेश खान, क्विंटन डिकॉक आणि प्रेरक मांकड.