Jaydev Unadkat Out Of IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज जयदेव उनाडकट आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो ब्रेकवर होता. मात्र आता तो या मोसमात पुनरागमन करू शकणार नाही. उनाडकटच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, तो नेटमध्ये सराव करताना त्याला दुखापत झाली होती.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी उनाडकट तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. उनाडकट या मोसमात केवळ ३ सामने खेळला आहे. यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही. मात्र याआधी त्याने अनेकवेळा चमकदार कामगिरी केली आहे.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

जयदेव उनाडकट गेल्या रविवारी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करत होता. यादरम्यान चेंडू फेकल्यानंतर तो सावरू शकला नाही आणि खाली पडला. उनाडकट डाव्या खांद्यावर पडल्याने जखमी झाला. आयपीएलने त्याचा व्हिडिओही ट्विट केला होता. पण आता क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार तो या मोसमात खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – DC vs GT: दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या फलंदाजांवर संतापला; म्हणाला, ‘फलंदाजांनी मोहम्मद शमीला…’

दुखापतीमुळे उनाडकट संपूर्ण मोसमातून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होऊ शकतो. उनाडकटला लवकरच बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले जाऊ शकते. लखनऊ टीमच्या वैद्यकीय टीमसह तो स्कॅनसाठी मुंबईला गेला आहे.

विशेष म्हणजे जयदेव उनाडकटला या मोसमातील ३ सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने ९२ धावा दिल्या. याआधीही त्याने चांगली कामगिरी केली आहे. उनाडकटने आयपीएलमध्ये एकूण ९४ सामने खेळले असून या कालावधीत त्याने ९१ विकेट घेतल्या आहेत. २५ धावांत ५ बळी घेणे ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. उनाडकटने आयपीएल २०१७ मध्ये २४ विकेट घेतल्या होत्या. या मोसमात तो १२ सामने खेळला होता.

हेही वाचा – IPL 2023 : राहुलच्या दुखापतीची चिंता; लखनऊ सुपर जायंट्सचा आज चेन्नई सुपर किंग्जशी सामना

आज IPL 2023 मध्ये ‘डबल हेडर’चा दिवस आहे, म्हणजे एका दिवसात दोन सामने. दिवसाचा पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या १६व्या हंगामातील हा ४५वा सामना असेल. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचे नेतृत्व कोण करेल हे सांगणे कठीण आहे. कारण गेल्या सामन्यात केएल राहुल जखमी झाला होता, परंतु चेन्नई सुपर किंग्जची कमान महेंद्रसिंग धोनीच्या हाती असेल. हा सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाईल.