LSG chance for Suryansh Shedge to replace Jaydev Unadkat: लखनऊ सुपर जायंट्सचा सर्वोत्तम गोलंदाज जयदेव उनाडकट दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघाने युवा खेळाडू सूर्यांश शेडगेला संधी दिली आहे. सूर्यांशने अंडर-19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. लखनऊच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे केएल राहुलचा कर्णधार असलेला संघ अडचणीत आला आहे. दुखापतीमुळे राहुलही संघातून बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत क्रृणाल पांड्या संघाची कमान सांभाळत आहे.

आयपीएलने ट्विट करून सूर्यांश लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्याची माहिती शेअर केली आहे. दुखापतग्रस्त जयदेव उनाडकटच्या जागी सूर्यांश शेडगेचा लखनऊ संघात समावेश करण्यात आल्याचे स्पर्धेच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. उनाडकट खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. सरावा दरम्यान तो खांद्यावर पडला होता. यामुळे तो जखमी झाला होता. त्याच्या जागी सूर्यांशला २० लाख रुपये देऊन संघात स्थान देण्यात आले आहे.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Indian Premier League Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad sport news
बंगळूरुच्या गोलंदाजांकडे लक्ष!
Rajasthan Royals Big Announcement
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध

कोण आहे सुर्यांश शेडगे?

सूर्यांश शेडगे हा उजव्या हाताचा युवा फलंदाज असून तो मुंबईकडून खेळतो. त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. सूर्यांश जाईल्स शील्ड स्पर्धेत सर्वात जलद त्रिशतक झळकावणारा म्हणून ओळखला जातो. गुंदेचा एज्युकेशन अकादमी (कांदिवली) साठी त्याने सात वर्षांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे SPSS मुंबादेवी निकेतन (बोरिवली) विरुद्ध या स्पर्धेत १३७ चेंडूत ३२६ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – KKR vs LSG: प्लेऑफपूर्वी एलएसजी संघाने केला मोठा बदल; केकेआरविरुद्धच्या सामन्यात लखनऊचे नवाब दिसणार नव्या अवतारात

लखनऊ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मोसमात लखनऊने १३ सामने खेळले आहेत. यादरम्यान संघाने सात सामने जिंकले. तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामना अनिर्णीत राहिला. लखनऊ आणि चेन्नईचे गुण समान आहेत. पण चेन्नईचा नेट रन रेट खूपच चांगला आहे. चेन्नई आणि लखनऊचे १५-१५ गुण आहेत.

हेही वाचा – Virat Kohli: “…म्हणून माझ्यासाठी १८ नंबरची जर्सी खास आहे”; दोन भावनिक आठवणी सांगताना विराटने केला खुलासा, पाहा VIDEO

लखनऊचा शेवटचा साखळी सामना कोलकात्याशी होणार आहे. हा सामना २० मे रोजी होणार आहे. पात्रता फेरी गाठण्यासाठी संघाला कोणत्याही परिस्थित या सामन्यात विजय मिळवावा लागेल. लखनऊने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवले आहेत. त्यानी हैदराबाद आणि मुंबईचा पराभव केला आहे.