इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ मधील एका घटनेत, लखनऊ सुपर जायंट्स (LSG) फलंदाज आयुष बडोनीने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या महिला चाहत्याच्या डोक्यावर षटकार मारला. गुरुवारी, ३१ मार्च २०२२ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामन्याच्या दुसऱ्या डावात हा प्रकार घडला. १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीपक हुडा बाद झाल्यानंतर आयुष बडोनी क्रीजवर आला आणि १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही घटना घडली.

लखनऊला शेवटच्या दोन षटकांत ३४ धावांची गरज होती. चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजाने १९ वे षटक टाकण्यासाठी मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेकडे चेंडू दिला. शिवम दुबेच्या पहिल्याच चेंडूवर या तरुणाने अविश्वसनीय संतुलन दाखवले. आयुषने शिवमच्या वाइड यॉर्करवर एक शानदार लोफ्टेड स्वीप मारला. आयुषचा हा शॉट सीमेबाहेर ८५ मीटर अंतरावरील प्रेक्षक गॅलरीत पडला.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

दुर्दैवाने चेंडू महिला चाहतीच्या डोक्याला लागला. महिला चाहतीने हाताने चेंडू पकडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला यश आले नाही आणि चेंडू तिच्या डोक्याला लागला. तिच्यासोबत तिचे काही मित्रही दिसले. ही घटना कैमेऱ्यात कैद झाली. तिला काही वेदना होत असल्याचं दिसत होतं. ही बातमी लिहिपर्यंत तिच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती.

आयपीएल २०२२ मधील लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे तर, रवींद्र जडेजाच्या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर २० षटकात ७ गडी गमावून २१० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुलच्या संघाने १९.३ षटकात ४ गडी गमावत २११ धावा केल्या आणि सामना जिंकला. लखनऊच्या आयुष बडोनीने दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. एविन लुईसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो २३ चेंडूत ५५ धावा करून नाबाद राहिला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले.