आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २२ व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरुला पराभूत करुन विजयाचा दुष्काळ संपवला. या सामन्यात चेन्नईचा २३ धावांनी विजय झाला. चेन्नईचा या हंगामातील पहिलाच विजय असल्यामुळे हा सामना अनेक कारणांमुळे संस्मरणीय ठरला. चेन्नईच्या मुकेस चौधरीने केलेल्या खराब क्षेत्ररक्षणाचीही चांगलीचा चर्चा होत आहे. संघाला विकेटची गरज असताना त्याने दोन झेल सोडल्यामुळे त्याच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र मुकेश चौधरीने दोन झेल सोडल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने त्याला काही सूचना केल्या. धोननी त्याला जवळ घेऊन त्याचे मनोबल वाढवले. धोनीच्या याच कामाची आता सर्वत्र चर्चा होत आहे. धोनी मुकेश चौधरीला सल्ला देत असलेले काही फोटो चर्चेचा विषय ठऱत आहेत.

हेही वाचा >>> IPL 2022, CSK vs RCB : गोव्याच्या प्रभुदेसाईची भन्नाट फिल्डिंग, मोईन अलीला ‘असं’ केलं बाद

चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने बंगळुरुचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला फक्त एका धावावर बाद केलं. मात्र त्यानंतर चौधरीने क्षेत्ररक्षणामध्ये खराब प्रदर्शन केलं. त्याने सुयस प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिक या महत्त्वाच्या फलंदाजांचे झेल सोडले. चेन्नईला याचा काही प्रमाणात फटकादेखील बसला. ड्वेन ब्राव्होना टाकलेल्या १२ व्या षटकामध्ये प्रभुदेसाईने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत गेल्यामुळे मुकेश चौधरीकडे सोपा झेल टिपण्याची संधी होती. मात्र चैधरी हा झेल टिपू शकला नाही. त्यानंतर प्रभुदेसाईने १८ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. त्यानंतर चौधरीने दिनेश कार्तिकचाही एक झेल सोडला.

हेही वाचा >>> विजयाचा दुष्काळ संपला ! शिवम दुबे-रॉबिन उथप्पा जोडीची तुफान फटकेबाजी; चेन्नईची बंगळुरुवर २३ धावांनी मात

मात्र माहीश तिक्षणाने शाहबाज अहमदला बाद केल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी महेंद्रसिंह धोनीने मुकेश चौधरीला बोलवून त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला काही सूचना केल्या. तसेच अनुभव असलेल्या धोनीने नवख्या मुकेश चौधरीला धीर दिला. धोनीच्या या कृतीचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. तसेच धोनी आणि चौधरी चर्चा करत असलेले काही फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा >>>“…तोपर्यंत मी लग्न करणार नाही”, RCB vs CSK सामन्यातील पोस्टर चर्चेत; चाहत्यांची RCB ला विनंती, “तिच्या भविष्याशी खेळू नका”

दरम्यान, चेन्नईने बंगळुरुसमोर २१७ धावांचे लक्ष्य उभे केले होते. मात्र बंगळुरुला फक्त १९३ धावा करता आल्या. चेन्नईने हा सामना २३ धावांनी जिंकला. चेन्नईचा या हंगामातील हा पहिलाच विजय आहे.