scorecardresearch

Premium

IPL 2023 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२३ चा अतिंम सामना गुजरात की चेन्नई? क्रिकेटच्या दिग्गजांनी केली भविष्यवाणी, पाहा VIDEO

IPL 2023 Winner Predictions: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात २८ मे २०२३ रोजी विजेतेपदाचा सामना खेळला जाणार. या सामन्यापूर्वी क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी कोण विजेता ठरणार याबाबत अंदाज व्यक्त केले आहे.

IPL Final GT vs CSK Match Updates
चेन्नई विरुद्ध गुजरात (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Who will be the winner of IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग २०२३ मधील अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या सामन्याआधीच अनेक दिग्गजांनी या सामन्याच्या विजेत्याबद्दल आपआपली भाकीतं केली आहेत.

क्रिकेटच्या दिग्गजांनी निवडला विजेता संघ –

आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. अशा स्थितीत या दोघांपैकी एकाची विजेता म्हणून निवड करणे फार कठीण आहे. या सामन्यातील विजेत्यांबाबत दिग्गजांची मतेही विभागली गेली आहेत. ज्यामध्ये काहींनी चेन्नईची बाजू घेतली तर काहींनी गुजरातची बाजू घेतली.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसनपासून ते एस श्रीशांत, फाफ डुप्लेसी आणि व्यंकटेश अय्यरपर्यंत सर्वांनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत. विजेत्याबाबत मॅथ्यू हेडन म्हणाला, ‘टाटा आयपीएल २०२३ साठी माझी चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्स असेल.’ केविन पीटरसन म्हणाला, ‘माझ्या मते, गुजरात टायटन्स यंदा चॅम्पियन बनेल.’

आयपीएल २०२३ च्या विजेत्यासाठी दिग्गजांनी व्यक्त केले अंदाज –

मॅथ्यू हेडन – चेन्नई सुपर किंग्ज
केविन पीटरसन – गुजरात टायटन्स
डु प्लेसिस – चेन्नई सुपर किंग्ज
एस श्रीशांत – चेन्नई सुपर किंग्ज
व्यंकटेश अय्यर – गुजरात टायटन्स

कोण कोणावर भारी?

हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण चार सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने साखळी फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. त्याचबरोबर आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक मारली. आजच्या सामन्यात सीएसकेचे पारडे जड दिसत आहे, कारण धोनीकडे खूप फायनल सामने खेळण्याचा अनुभव आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final GT vs CSK: जेतेपदाच्या सामन्यात एमएस धोनी मैदानात उतरताच रचणार इतिहास, ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरणार पहिलाच खेळाडू

सीएसके संघाने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. सीएसकेच्या संघाने १०व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलच्या केवळ १४ हंगामात संघ खेळला आहे. संघाकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात. त्याचबरोबर गुजरात टायटन्सलाही कमी लेखून चालणार नाही. कारण त्यांनी आपल्या पहिल्याच हंगामात ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यांच्याकडे देखील अनुभवी खेळाडूंची फौज आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Matthew hayden kevin pietersen s sreesanth faf duplessi venkatesh iyer predict who will win ipl 2023 vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×