scorecardresearch

Premium

MI vs KKR: …भाऊराया! स्विंगवर अर्जुन तेंडुलकरने फलंदाजाला चकवले, बहीण सारा तेंडुलकर झाली भावूक, Video व्हायरल

Arjun Tendulkar: आयपीएलच्या २०२१ हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनलेल्या अर्जुन तेंडुलकरला कोलकाता विरुद्धच्या १६व्या हंगामात संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

MI vs KKR: Arjun Tendulkar excellent bowling the batsman, sister Sara Tendulkar gets emotional Video goes viral
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

Arjun Tendulkar on Indian Premier League 2023: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आयपीएलच्या १६व्या हंगामातील २२वा सामना खूप खास बनला. २०२१ मध्ये मुंबई संघाचा भाग झाल्यानंतर, सर्व क्रिकेट चाहते अर्जुनच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत होते, त्यानंतर अखेरीस त्याला या हंगामात ही संधी देण्यात आली. यादरम्यान सारा तेंडुलकरही तिच्या भावाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.

मुंबई इंडियन्सच्या या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईकडून गोलंदाजी सुरू करण्याची जबाबदारी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनकडे सोपवण्यात आली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्जुनने बॅट चुकवून आऊटसाठी जोरदार अपील केले पण पंचांनी ते नाकारले. यादरम्यान अर्जुनची गोलंदाजी पाहून साराची प्रतिक्रियाही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
mrinal kulkarni virajas and shivani
“शिवानी आणि विराजस, तुम्ही दोघेही…,” मृणाल कुलकर्णींनी व्यक्त केला आनंद, जाणून घ्या खास कारण

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने मुंबईचे नेतृत्व केले. त्याचवेळी या सामन्यात भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल पदार्पण केले. या सामन्यासाठी अर्जुनची बहिण सारा ही मैदानात उपस्थित होती. आपल्या भावाला पदार्पण करताना पाहून तिचे डोळे पाणावले.

विशेष म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अर्जुनला दिली. अर्जुनने पहिला चेंडू टाकला त्यावेळी सारा हिच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या दिसल्या. साराने या सामन्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींसह हजेरी लावली. अर्जुनने सामन्यातील पहिले षटक टाकताना केवळ पाच धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या शतकात गोलंदाजीला आल्यावर व्यंकटेश अय्यर याने त्याला एक चौकार व एक षटकार खेचला.

हेही वाचा: IPL2023, MI vs KKR: तुझी नी माझी खुन्नस! दिल्लीच्या गोलंदाजाने बाद करताच कोलकाताच्या कर्णधाराचा चढला पारा, सूर्याने मध्यस्थी केली नसती तर..

मुंबई इंडियन्सने सामना जिंकला

आयपीएल २०२३चा २२वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतत मुंबईने सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. व्यंकटेश अय्यरने झळकावलेल्या शतकानंतरही केकेआरला या सामन्यात ५ विकेट्सने पराभूत व्हावे लागले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mi vs kkr arjun tendulkar dodged the batsman on the swing sister sara tendulkar jumped with joy reaction viral avw

First published on: 16-04-2023 at 20:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×