Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Score Update: रविवावरच्या डबल हेडरमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करत होता. नियमित कर्णधार रोहित शर्माची तब्येत बिघडल्याने त्याला इम्पॅक्ट खेळाडूंच्या यादीत ठेवले गेल होते. तरी तो सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला. इशानच्या साथीने आक्रमक सुरुवात करून देत त्याने विजयाचा भक्कम पाया रचला. मुंबई पलटणने कोलकातावर तब्बल पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

कोलकाताने ठेवलेल्या १८६ धावांचा पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात केली. सलामीवीर इशान किशनने अफलातून अर्धशतक करत मुंबईला विजयाची वाट सोपी करून दिली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईसाठी स्फोटक सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४.५ षटकात ६५ धावा जोडल्या. रोहित २० धावा करून सुयश शर्माच्या चेंडूवर उमेश यादवकरवी झेलबाद झाला. सूर्या आणि किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी २२ धावांची भागीदारी केली. ईशान किशन २५ चेंडूत ५८ धावांची खेळी खेळून बाद झाला. तो वरुण चक्रवर्तीने क्लीन बोल्ड झाला. इशान किशनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी खेळली.

Shreyanka Patil Finger Fractured
Team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, ‘मॅच विनर’ खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
Deshpande T20 International Debut
IND vs ZIM 4th T20 : मुंबईचा मुलगा, धोनीचा शिष्य, कोण आहे तुषार देशपांडे? ज्याने टीम इंडियासाठी केले पदार्पण
Yuvraj Singh explosive batting 28 balls 59 runs
WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
Shubman Gill reaction to India win
IND vs ZIM 2nd T20 : रेकॉर्ड ब्रेकिंग विजयानंतर शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”आज काय होणार आहे हे…”
The procession of the Twenty20 World Cup winning Indian cricket team was organized in Mumbai sport
दिग्विजयाचा आज मुंबईत जल्लोष; ट्वेन्टी२० विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या मिरवणुकीचे आयोजन
Suryakumar yadav received best fielder medal from Jay shah video
IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO
IND vs SA Final Score T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final: रोहित शर्माच्या टीम इंडियाने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
IND vs SA Final
IND vs SA Final : हाती तिरंगा अन् ‘टीम इंडिया जिंदाबाद’च्या घोषणा; अंतिम सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये प्रेक्षकांचा उत्साह; पाहा VIDEO

तत्पूर्वी, केकेआने नाणेफेक गमावल्यानंतर नितीश राणा याच्या नेतृत्वातील संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. कोलकाताने पावरप्ले दरम्यान नारायन जगदीसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार नितीश राणा याने डावातील ९व्या षटकात विकेट गमावली. मुंबईचा युवा फिरकीपटू हृतिक शोकीन या षटकात गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिलाच चेंडू राणाने षटकारासाठी खेळला. पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही. रामदीप सिंग याच्या हातात तो झेलबाद झाला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राणाने १० चेंडूत ५ धावा केल्या आणि विकेट गमावली. एकीकडे केकेआर झटपट विकेट्स गमावत असताना दुसरी बाजू वेंकटेश अय्यर याने सांभाळून ठेवली.  कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावा केल्या. त्याचवेळी, आंद्रे रसेलने ११ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. मुंबईकडून हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी अर्जुन वगळता इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: IPL 2023: गुडघ्याला दुखापत, धावताना त्रास तरीही ठोकले खणखणीत शतक! ब्रेंडन मॅक्युलमनंतर व्यंकटेश अय्यर ठरला दुसरा नाईट रायडर

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पोट दुखत असल्यामुळे प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारने नाणेफेक केली आणि जिंकली देखील. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन हंगामांपासून मुंबई संघासोबत सराव करत आहे. दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर रविवारी अखेर अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली.