Sourav Ganguly on Suryakumar Yadav: बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मंगळवारी RCB विरुद्ध मुंबईच्या मॅच-विनिंग इनिंगनंतर सूर्यकुमार यादवला जगातील सर्वोत्कृष्ट टी२० खेळाडू म्हणून घोषित केले. आयपीएल २०२३ मध्ये सूर्यकुमारची सुरुवात संथ होती परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये तो उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला आहे. ३२ वर्षीय खेळाडूने गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत आणि या सर्व सामन्यांमध्ये पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. सूर्यकुमार यादवने चालू आयपीएलमध्ये ११ सामन्यांमध्ये ३४.१८च्या सरासरीने आणि १८६.१४च्या प्रभावी स्ट्राइक-रेटने ३७६ धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी केली. सूर्याच्या ८३ धावांच्या मॅचविनिंग इनिंगमुळे मुंबईने आरसीबीसमोर केवळ १६.३ षटकांत २०० धावांचे लक्ष्य पार केले. आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही सूर्यकुमार यादवच्या या उत्कृष्ट खेळीचे कौतुक केले आहे.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

हेही वाचा: IPL2023: विराटचे आलिंगन-सचिनकडून कौतुक, सूर्याच्या वादळी खेळीपुढे सारेच नतमस्तक; पाहा Video

सूर्याची सर्वात मोठी आयपीएल धावसंख्या

मंगळवारी आरसीबीविरुद्ध सूर्यकुमारने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले. एकाच षटकात रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांच्या विकेट्स गमावल्यानंतर सूर्या मैदानात आला. सूर्यकुमारने नेहल वढेरासोबत सामना जिंकणारी खेळी खेळली आणि अवघ्या ३५ चेंडूत ८३ धावा ठोकल्या. सूर्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ही सर्वोत्तम धावसंख्या होती. २०० धावांचा पाठलाग करताना मुंबईने २१ चेंडू आणि ६ विकेट्स राखून सामना जिंकला. सूर्याचे त्याच्या खेळीचे प्रचंड कौतुक होत आहे. स्कायच्या इनिंगवर सौरव गांगुलीचे ट्विट चाहत्यांना आवडले.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषक २०२३साठी ‘हे’ आठ संघ ठरले पात्र! माजी विजेत्यांसह दोन जागांसाठी खेळणार पात्रता फेरीचे सामने

मला माझा खेळ माहित आहे: सूर्या

ट्विटरवर बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी लिहिले की, “सूर्यकुमार हा जगातील सर्वोत्तम टी२० खेळाडू आहे.” तो पुढे म्हणाला की, “एमआयच्या ह्या स्टार फलंदाजाची खेळी पाहताना असे वाटले जणू काही तो संगणकावर फलंदाजी करत असल्याचे जाणवले.” गांगुलीने ट्विटमध्ये पुढे असे म्हटले आहे की, “सूर्यकुमार यादव जगातील सर्वोत्तम टी२० खेळाडू आहे, भारताला लाभलेले एक प्रकारचे गिफ्ट आहे.”

आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर, सूर्यकुमार म्हणाला की, “मी माझ्या योजनांवर ठाम राहण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या खेळात फारसा बदल केला नाही.” सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात सूर्यकुमार पुढे म्हणाला, “तुम्हाला सामन्यात काय करायचे आहे, असा तुमचा सराव असला पाहिजे. माझ्या धावा कुठे होणार  आहेत हे मला माहीत आहे. आमच्याकडे ओपन नेट सेशन आहेत. मला माझा खेळ माहित आहे. मी काही वेगळे करत नाही.”