Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: मुंबई इंडियन्स आणि सनराजयर्स हैदराबादचा सामना वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर झाल्याने मुंबईचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. ग्रेस हेडन म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनच्या लेकीने या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. ज्याचा व्हीडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. ग्रेस हेडनही चाहत्यांसोबत मुंबईचा राजा रोहित शर्मा असं म्हणत रोहितला चिअर करताना दिसला.

मॅथ्यू हेडन सध्या आयपीएल २०२४ साठी भारतात असून त्याची लेक ग्रेस हेडन आयपीएल २०२४ साठी स्टार स्पोर्टससाठी प्रेझेंटर म्हणून काम करत आहे. मुंबई-हैदराबादच्या सामन्यापूर्वी ग्रेस हेडनही रोहित शर्माला चिअर करताना दिसली. प्रेझेंटर असलेल्या ग्रेसने मुंबईच्या सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर पोहोचली होती. सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमबाहेर मुंबईच्या चाहत्यांना भेटली आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. यादरम्यान चाहत्यांनी तिला मुंबईचा राजा रोहित शर्मा हे बोलायला शिकवले. त्यानंतर तिनेही चाहत्यांसोबत रोहितला चिअर केलं, ज्याचा व्हीडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे.

ग्रेस हेडनने चाहत्यांशी संवाद साधत मुंबईलाही चिअर केलं. वानखेडे स्टेडियमबाहेरील गर्दी पाहून ग्रेसही भारावली. तिने जितेगा भाई जितेगा मुंबई जितेगा अशी चाहत्यांसोबत घोषणाबाजी केली. तर मुंबईचा झेंडाही ती हातात घेऊन फिरवाताना दिसली. ग्रेसने स्टार स्पोर्ट्सकडून प्रेझेंटर म्हणून आयपीएल चांगल्याप्रकारे कव्हर केले आहे.

मुंबई इंडियन्सने चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत घरच्या मैदानावर हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव केला. या पराभवासह हैदराबादचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग मुंबईने अधिक खडतर केला आहे. हैदराबादने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सू्र्यकुमार यादवच्या शतकाच्या आणि तिलक-सूर्याच्या १४३ धावांच्या भागादारीच्या जोरावर मोठा विजय नोंदवला. मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पियुष चावला यांनी सर्वाधिक ३-३ विकेट्स घेतल्या.