लाहोर : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्श दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. तसेच त्याच्या ‘आयपीएल’मधील सहभागाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० वर्षीय मार्शला यंदा ‘आयपीएल’च्या खेळाडू लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. तो पाकिस्तानविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेनंतर ६ एप्रिलला दिल्लीच्या संघात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाल्यानंतरच तो ‘आयपीएल’मध्ये खेळणार की नाही, हे निश्चित केले जाणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell marsh ipl participation in doubt due to injury zws
First published on: 30-03-2022 at 04:14 IST