Mitchell Marsh Six Hits Car Video IPL 2025: लखनौ संघ प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी हैदराबादविरूद्ध सामना खेळत आहे. लखनौने आपलं आव्हान कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघाने फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली. संघाने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांचे आव्हान हैदराबादला दिले.

लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शने या सामन्यात संघाला वेगवान सुरुवात दिली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरूवात केली. नंतर चौकार षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने एका अनोख्या पद्धतीने सामाजिक योगदानही दिले.

लखनौ सुपर जायंट्सच्या डावातील सहाव्या षटकात, मिचेल मार्शने इशान मलिंगाच्या षटकात चांगलीच फटकेबाजी केली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, मिचेल मार्शने एका लेंथ बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर एक लांब षटकार मारला. हा षटकार थेट सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारवर जाऊन धडकला, ज्यामुळे कारला डेंट आला. त्यामुळे या षटकाराची किंमत ५ लाख रुपये झाली.

हंगामाच्या सुरुवातीला, टाटा मोटर्सने घोषणा केली होती की जर कोणत्याही फलंदाजाने थेट गाडीवर चेंडू मारला तर ते ग्रामीण क्रिकेट विकासासाठी ५ लाख रुपयांचे क्रिकेट किट दान करतील. त्यामुळे मार्शचा हा षटकार या उपक्रमाचा एक भाग बनला.

टाटा मोटर्स आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहेत. कंपनीने यापूर्वीही असेच उपक्रम हाती घेतले आहेत, जसे की २०२३ मध्ये कॉफी लागवडीसाठी १० लाख रुपये देणगी देणे. त्याच वेळी, २०२२ मध्ये, या समुहाने घोषणा केली होती की जर फलंदाजाचा फटका टाटा पंच बोर्डवर किंवा सीमेबाहेर उभ्या असलेल्या कारवर लागला तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला ५ लाख रुपये दान केले जातील. हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्याचे घर म्हणून ओळखले जाते.

मिचेल मार्शने या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरुवात दिली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. मिचेल मार्शने एकूण ३९ चेंडूंचा सामना केला आणि १६६.६६ च्या सरासरीने ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावा केल्या.