आयपीएल क्रिकेटच्या १५ व्या हंगामाचा थरार २६ मार्चपासून सुरु होणार आहे. या हंगामाच्या पहिल्याच दिवशी गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ एकमेकांना भिडतील. हा सामना अगदी उद्यावर येऊ ठेपल्यामुळे दोन्ही संघांनी मैदानावर बहारदार खेळ करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, पहिला सामना खेळण्याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा दिलासा मिळालाय. चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली भारतात आला असून तो चेन्नई संघात सामील झाला आहे.
अर्ज करुनही मागील अनेक दिवसांपासून मोईन अलीला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नव्हता. मोईन अली हा चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघामध्ये त्याला खूप महत्त्व आहे. मात्र भारतात येण्यास अडचणी येत असल्यामुळ तो संघात कधी सामील होणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र २४ मार्च रोजी तो भारतात आला असून लगेच तो चेन्नई संघात सामील झालाय. त्याच्या आगमनामुळे आता चेन्नईला आणखी बळ मिळाले असून आगामी सामने शक्तीनिशी खेळण्यास चेन्नईला मदत होणार आहे.
मोईन अली पहिला सामना खेळू शकणार नाही
मोईन अली संघात सामील होणं ही चेन्नईसाठी दिलासादायक बाक असली तरी तो कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. कोरोना संसर्गामुळे परदेशातून आल्यामुळे त्याला काही दिवसांसाठी क्वॉरन्टाईन व्हावे लागणार आहे. क्वॉरन्टाईनचा काळ पूर्ण केल्यावरच त्याला बायोबबलमध्ये प्रवेश दिला जाईल.
दरम्यान, 34 वर्षाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू मोईन अलीला चेन्नईने आठ कोटी रुपये देऊन महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड सोबत चेन्नईने रिटेन केलेलं आहे. त्याने आयपीएल २०२१ च्या हंगमात पंधरा सामन्यांत ३५७ धावा केलेल्या होत्या. तर ६ बळीदेखील त्याच्या नावावर आहेत.