Mohit Sharma Bold to Suryakumar Yadav: शुबमन गिलच्या वादळी शतकाच्या आणि मोहित शर्माच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने मुंबईचा ६२ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या दमदार विजयाच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान एक काळ असा होता की मुंबईचा संघ विजयाचा विचार करत होता. वास्तविक सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी केल्याने मुंबई हा सामना जिंकेल असे वाटत होते. परंतु मोहित शर्माने सूर्यकुमारला बाद करत सामना गुजरातच्या दिशेने फिरवला. हा सामन्याचा मोठा टर्निंग पॉइंट ठरला, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहित शर्माने सूर्याला बोल्ड करत सामन्याला कलाटणी दिली आणि गुजरातच्या विजयाचे दरवाजे उघडले. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या सामन्यात सूर्याने ३८ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. दरम्यान सूर्यकुमार यादवचा बाद होण्यापूर्वी चेंडू मागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मोहित शर्माने चतुराईने सूर्याचा लेग स्टंप उडवला. सूर्यकुमार यादवला बाद केल्यानंतर मोहितने आपल्या विकेटचा आनंद शांतपणे साजर केला. तसेच इथेच गुजरातचा विजय जवळपास निश्चित झाला होता.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

शुबमन आणि मोहित यांनी सामन्याला कलाटणी दिली –

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २३३ धावा केल्या होत्या. गुजरातकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे गुजरातला धावांचा टायटन्स उभारता आला. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी खेळली. ही त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील सर्वात मोठी खेळी ठरली. यानंतर २३३ धावांचा बचाव करताना मोहित शर्माने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने आपल्या २.२ षटकांच्या स्पेलमध्ये १० धावा देत पाच बळी घेतले.

हेही वाचा – MI vs GT: मुंबईविरुद्ध शतक झळकावत शुबमन गिलने रचला इतिहास, अनेक दिग्गजांना मागे टाकत लावली विक्रमांची रांग

२३४ धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ६१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त तिलके वर्माने १४ चेंडूंत ४३ आणि कॅमेरुन ग्रीनने २० चेंडूंत ३० धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल अपयशी ठरले. गोलंदाजीत आकाश मधवाल आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.