Mayank Yadav available for match against MI Match : लखनऊ सुपरजायंट्सचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल सांगितले की, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मयंक यादव तंदुरुस्त झाला आहे. तो मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल. मंगळवारी लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर मुंबई आणि लखनऊ यांच्यातील सामना रंगणार आहे. मयंकने आयपीएलमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात शानदार केली होती. तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीर ठरला होता.

सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मयंकच्या नावावर –

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मयंकने या मोसमातील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. वास्तविक, पंजाबविरुद्धच्या सामन्यात मयंकने ताशी १५५.८ किमी वेगाने चेंडू टाकला होता. त्याच वेळी, आरसीबीविरुद्ध, त्याने ताशी १५६.७ मी वेगाने चेंडू फेकून स्वतःचा विक्रम मोडला. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू आहे. उमरान मलिकनंतर ताशी १५६ किमी वेगाने चेंडू टाकणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. त्याचबरोबर या लीगमध्ये अशी कामगिरी करणारा तो एकूण पाचवा गोलंदाज ठरला आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान मयंकला दुखापत झाली आणि फक्त एक षटक टाकल्यानंतर त्याने मैदान सोडले होते. या सामन्यानंतरही मयंक मैदानाबाहेर आहे. मयंकला पोटाचा त्रास होत होता. मात्र, मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मॉर्केलने मयंकने सर्व फिटनेस टेस्ट पास केल्याची पुष्टी केली. मॉर्केलने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मयंक यादव तंदुरुस्त असून त्याने सर्व फिटनेस टेस्ट पास केल्या आहेत. त्याच्या संघातील पुनरागमनामुळे आम्ही सर्व उत्साहित आहोत. तो १२वा खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे.”

हेही वाचा – IPL 2024 : अश्विनला २०२५ कोणी खरेदी करणार नाही; ‘हा’ माजी भारतीय खेळाडू राजस्थानच्या ऑफस्पिनरवर संतापला

मयंकने नेटमध्ये गाळला घाम –

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी, लखनऊचे सहाय्यक प्रशिक्षक एस श्रीराम यांनी देखील मयंक यादवबद्दल पुष्टी केली. त्यानी सांगितले की, मयंक एलएसजी संघासठी खेळताना दिसणार आहे. कारण त्याने नेटमध्ये भरपूर सराव केला आहे. श्रीराम म्हणाले, मयंकने नेटमध्ये गोलंदाजी केला आहे. त्यामुळे तो सामन्यात कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल.