Deepak Chahar Reveals Secrets About His Love Story : एम एस धोनी फक्त चालाख आणि महान कर्णधार आणि विकेटकीपरच नाही, तर तो एक जबरदस्त लवगुरु सुद्धा आहे. याचा खुलासा टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपर चहरने नुकताच केला आहे. दीपकने ऑक्टोबर २०२१ मध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पंजाब किंग्जविरोधात झालेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल २०२१ च्या सामन्यात प्रेयसी जया भारद्वाजला अचानक प्रपोज केला होता. दीपकने अचानक केलेल्या अशा कृत्यामुळं जयाला धक्का बसला होता. त्यानंतर तिने दीपकला होकार दिला आणि लव्हबर्ड्सने स्टेडियममध्ये एकमेकांना अंगठी घातली होती.

जेव्हा धोनी बनला होता दीपक चहरसाठी लव गुरु

दीपक चहर आणि जया भारद्वाज जून २०२२ मध्ये आग्र्यात लग्नाच्या बंधनात अडकले होते. याचदरम्यान रोमॅंटिक प्रपोजलची कल्पना एम एस धोनीनं चहरला दिली होती. त्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल २०२१ च्या प्ले ऑफच्या सामन्यात जयाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी चहर जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि सीएसके फायनलमध्ये पोहोचली होती.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

नक्की वाचा – IPL 2023 : विमानात CSK च्या खेळाडूंनी केली धमाल, गुपचूप Video काढणाऱ्याला धोनीनं दिली भन्नाट रिअ‍ॅक्शन 

दीपकने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सच्या एका लेटेस्ट एपिसोडमध्ये गौरव कपूरसोबत संवाद साधताना म्हटलं की, “मी आयपीएल २०२१ च्या फायनलच्या दरम्यान जयाला प्रपोज करणार होतो, कारण तो एक जबरदस्त क्षण होता. पण एम एस धोनीनं मला सल्ला दिला की, मी याबाबत जास्त विचार करू नये आणि फक्त प्रपोज कर. कारण यामुळे माझं लक्ष आयपीएल २०२१ च्या प्ले ऑफ सामन्यामध्ये विचलित झालं असतं. ज्यामुळे संघावर परिणाम झाला असता, असं धोनीचं म्हणण होतं. माही भाईने मला सांगितलं की, क्वालिफायर सामन्याआधी जयाला प्रपोज कर, कारण मला प्ले ऑफच्या सामन्यात लक्ष केंद्रीत करता येईल आणि ७ तारीख आमच्या दोघांचीही फेव्हरेट आहे.”