IPL 2023, GT vs CSK Match Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत ५ गडी राखून १८२ धावा करत आयपीएलमधील पहिल्या सामन्यावर विजयाचा शिक्कामोर्तब केला. गुजरातविरोधात चेन्नईचा पराभव झाल्यानंतर महेंद्र सिंग धोनीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी धोनीने चेन्नईच्या पराभवाच्या कारणांबाबत भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धोनीने माध्यमांशी बोलताना म्हटलं, “१५ ते २० धावा जास्त झाल्या असत्या तर चांगलं झालं असतं. मैदानात दव असू शकतं, याची आम्हाला आधीच कल्पना होती. सामना ७.३० वाजता सुरु होणार होता, त्यामुळे सुरुवातीला चेंडू थोडा धीम्या गतीनं येतो. तसंच मधल्या षटकांमध्ये आम्ही अजून चांगली फलंदाजी करु शकलो असतो. ऋतुराजचं कौतुक करत धोनी म्हणाला, ऋतुराजला फलंदाजी करताना पाहणं खूप जबरदस्त अनुभव असतो. त्याने स्वत:ला खूप चांगल्या पद्धतीत तयार केलं आहे आणि दबावात तो योग्य निर्णय घेतो.”

नक्की वाचा – शतकाच्या उंबरठ्यावर ऋतुराजचा झंझावात थांबला; ‘त्या’ षटकात अल्झारी जोसेफने नो बॉल फेकला होता का? पाहा Video

चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीला उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने सुरुवातीच्या षटकांपासूनच गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजने ५० चेंडूत ९२ धावा कुटल्या. या इनिंगमध्ये ऋतुराजने ९ षटकार आणि ४ चौकार ठोकले. ऋतुराजच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईला १७८ धावांपर्यंत मजल मारला आली. तसंच मोईन अलीने १७ चेंडूत २३ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने (२६), मोहम्मद शामीने (२९) तर अल्झारी जोसेफने ३३ धावा देत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni explains about chennai supar king mistake against gujrat titans ipl 2023 match gujarat defeat csk nss
First published on: 01-04-2023 at 10:15 IST