scorecardresearch

IPL 2023 CSK vs GT: एमएस धोनी पहिल्या सामन्यात खेळणार नाही? मग कोण सांभाळणार सीएकेचे धुरा, जाणून घ्या

MS Dhoni Injury: आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार खेळणार की नाही याची चर्चा सुरू आहे. वास्तविक, माही सरावादरम्यान जखमी झाला आहे, परंतु चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने त्याची दुखापत किती गंभीर आहे,याबाबत विधान केले आहे.

MS Dhoni has injured
एमएस धोनी (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

MS Dhoni leg Injury: आयपीएल २०२३ मधील पहिला सामना आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात आहे. तत्पुर्वी सीएसके संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सराव सत्रात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. म्हणून पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान संघाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी अशी कोणतीही शक्यता नाकारली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धोनीची ही दुखापत सीएसके आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. अशा स्थितीत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.जर धोनी आयपीएलच्या सलामीच्या सामन्यातून बाहेर पडला, तर त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार? जर आपण संभाव्य नावांवर नजर टाकली तर सीएसकेकडे संघात चार कर्णधारपदाचे पर्याय आहेत, ज्यात दोन भारतीय आणि दोन परदेशी खेळाडू आहेत.

हेही वाचा – IPL 2023 : चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का, आघाडीचा गोलंदाज ‘या’ कारणामुळे आयपीएलबाहेर

जर धोनी गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिला सामना खेळणार नसेल, तर सीएसके त्याच्या जागी कर्णधार म्हणून पहिला पर्याय म्हणून बेन स्टोक्सची निवड करू शकेल. स्टोक्सला चेन्नईने संघाच्या नेतृत्व गटाचा एक भाग बनवले आहे. त्याला सीएसतकेचा भावी कर्णधार म्हणून संघात समाविष्ट केले आहे. या इंग्लिश खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आक्रमक कर्णधारपदाची छाप सोडली आहे. पण स्टोक्सची समस्या ही आहे की तोही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत संघ इतर पर्यायांचाही शोध घेत राहील.

हेही वाचा – IPL 2023 : चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का, आघाडीचा गोलंदाज ‘या’ कारणामुळे आयपीएलबाहेर

सीएसकेकडे दुसरा परदेशी खेळाडू म्हणून मोईन अलीच्या रूपाने पर्याय आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत मोईनने अलीकडेच इंग्लंड टी-२० संघाची जबाबदारी स्वीकारली होती. मोईनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ११ सामने खेळले, ज्यात संघाला ५ वेळा विजय मिळवता आला. अशा स्थितीत सीएसकेला पहिल्या सामन्यात त्याचा अनुभव वापरता येईल.

हेही वाचा – IPL इतिहासातील ‘नर्व्हस ९९’; शतकाच्या उंबरठ्यावर असताना ‘या’ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

दुसरीकडे, भारतीय खेळाडूंच्या पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर, या शर्यतीत रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे आहेत. गेल्या मोसमात धोनीने जडेजाकडे संघाची कमान सोपवली होती, पण हा अष्टपैलू खेळाडू कर्णधारपदाचा दबाव सहन करू शकला नाही. त्यामुळे त्याने मोसमाच्या मध्यात धोनीकडे कर्णधारपद सोपवले. दुसरीकडे, जर आपण अजिंक्य रहाणेबद्दल बोललो, तर त्याच्याकडे आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे, परंतु तो सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवेल की नाही हा मोठा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 09:40 IST

संबंधित बातम्या