MS Dhoni impressed by Mumbai 17 year old Ayush Mhatre : चेन्नई सुपर किंग्जने मुंबईचा १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेला आयपीएल लिलावापूर्वी ट्रायलसाठी बोलावले आहे. म्हात्रेने नुकतीच रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामध्ये त्याने शतकही झळकावले आहे. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संघाचे स्काऊट्स म्हात्रेच्या कामगिरीने प्रभावित झाले आहेत. सीएसकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला म्हात्रेला ट्रायलसाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. जेद्दाह येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल लिलावापूर्वी या ट्रायल होणार आहेत.

सीएसकेने आयुष म्हात्रेसाठी एमसीएच्या सचिवांना केला ईमेल –

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १७ वर्षीय फलंदाज म्हात्रेच्या या कामगिरीने सीएसकेला प्रभावित केले आहे. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी एमसीएचे सचिव अभय हडप यांना ईमेल पाठवून म्हात्रेला ट्रायलसाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, ‘सीएसकेच्या निवड चाचण्या १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सीएसकेएचपीसी नवलूर मैदान, चेन्नई येथे होणार आहेत. आम्ही एमसीएला आयुष म्हात्रेला ट्रायलसाठी भाग घेण्याची परवानगी देण्याची विनंती करतो.’

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या संभाव्य संघात आयुष म्हात्रेचाही समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पाचव्या फेरीदरम्यान सहा दिवसांच्या विश्रांतीदरम्यान सीएसकेने आयुषला ट्रायलसाठी बोलावले आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

आयुष म्हात्रेची कामगिरी –

आयुष म्हात्रेने यंदाच्या मोसमात मुंबईसाठी प्रथम श्रेणीत पदार्पण केले आहे. लखनौमध्ये त्याने रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध इराणी चषकात पदार्पण केले. म्हात्रेने आतापर्यंत पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३५.६६ च्या सरासरीने ३२१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि एक अर्धशतकही आहे. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध खेळताना म्हात्रेने १७६ धावांची शानदार खेळी केली. ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

Story img Loader