scorecardresearch

विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी २०० क्लबमध्ये, आयपीएलमध्ये ‘असा’ विक्रम करणारे फक्त दोघे!

एकाच फ्रेंचायझीकडून २०० सामने खेळणारे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे दोनच खेळाडू आहेत.

ms dhoni
महेंद्रसिंह धोनी (संग्रहित फोटो)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४९ वा सामना चेन्नई आणि बंगळुरु या संघांमध्ये खेळवला जातोय. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी बंगळुरु संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. चेन्नई संघाचीही अशीच स्थिती आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एक आगळा-वेगळा विक्रम नोंदवला आहे. महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून आज २०० वा सामना खेळत आहे.

हेही वाचा : क्रिकेटपटू वृद्धिमान साहा धमकी प्रकरण, पत्रकार बोरिया मजुमदार यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये पिवळ्या जर्सीमध्ये म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून आज २०० वा सामना खेळतोय. याआधी २०० किंवा २०० पेक्षा जास्त सामने खेळण्याचा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून आतापर्यंत २१८ सामने खेळले आहेत. कोहली आणि धोनी असे फक्त दोनच खेळाडू २०० च्या क्लबमध्ये आहेत.

हेही वाचा : अरे बापरे! मोहम्मद शमीच्या चेंडूवर लगावला ११७ मीटर लांबीचा षटकार, लियामची फलंदाजी पाहून सगळेच अवाक

२०० च्या क्लबमध्ये आणखी कोण सामील होणार?

कोणत्याही एकाच फ्रेंचायझीकडून २०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सध्या विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे दोनच खेळाडू सामील आहेत. आगामी काळात किरॉन पोलर्ड हादेखील या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. कारण त्याने मुंबई संघाकडून आतापर्यत १८७ सामने खेळले आहेत. मात्र या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी आता पोलार्डला आयपीएलच्या पुढच्या हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. सुरेश रैना या हंगामात कोणत्याही संघाकडून खेळत नाहीये. त्यानेदेखील चेन्नईकडून आतापर्यंत १७६ सामने खेळले आहेत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून आतापर्यंत १७७ सामने खेळले आहेत.

हेही वाचा : राहुल तेवतियाला राग अनावर, भर मैदानात साई सुदर्शनवर भडकला, पाहा व्हिडीओ

बंगळुरु संघाचे प्लेइंग इलेव्हन

फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड

हेही वाचा : सरकारने ३३ वर्षांपूर्वी दिलेला प्लॉट सुनिल गावस्कर यांनी केला परत; आव्हाड यांनी व्यक्त केली होती नाराजी, नेमकं काय घडलं?

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक आणि कर्णधार), रविंद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी, माहिश तिक्षाणा

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni joins virat kohli played 200 matches with chennai super king in rcb vs csk prd

ताज्या बातम्या