…W,0,W,W,0,0! जसप्रित बुमराहसमोर केकेआरचे लोंटागण; केलं पाच फलंदाजांना बाद

कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुरुवातीला फलंदाजीसाठी येत धमाकेदार सुरुवात केली.

JASPRIT BUMRAH
जसप्रित बुमराह (फोटो-iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार गोलंदाजी केली. गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स संघाला १६५ धावांवर रोखलं. मुंबईच्या जसप्रित बुमराहने तर नेत्रदीपक कामगिरी करत पाच फलंदाजांना बाद केलं. त्याच्या या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

हेही वाचा >>> मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स संघाने सुरुवातीला फलंदाजीसाठी येत धमाकेदार सुरुवात केली. ६० धावा झालेल्या असताना कोलकाताचा पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर १३६ धावसंख्येपर्यंत कोलकाता संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसले. त्यानंतर मात्र मुंबईच्या जसप्रित बुमराहने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने या सामन्यात कोलकाताच्या पाच फलंदाजांना बाद केलं. सतराव्या षटकात तर त्याने तीन फलंदाजांना तंबुत पाठवलं.

हेही वाचा >>> दोन वेळा विजय, 2 वेळा फायनल; जाणून घ्या हिरव्या रंगाची जर्सी आणि RCBचं खास कनेक्शन

सतराव्या षटकात एकही धाव न देता बुमहराहने शेल्डन जॅक्सन (५), पॅट कमिन्स (०), आणि सुनिल नरेन (०) या तीन फलंदाजांना बाद केलं. या तीन विकेट्समुळे कोलकाता संघ चांगलाच अडचणीत आला. यापूर्वी त्याने चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या नितीश राणालादेखील झेलबाद केले. तसेच त्याने आंद्र रसेल या घातक फलंदाजाला तंबूत पाठवण्यात यश मिळवलं. त्याच्या याच गोलंदाजीमुळे कोलकाता संघ खिळखिळा झाला. कोलकाताला वीस षटकांमध्ये १६५ धावांपर्यंत मजल मारता आली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai indian bowler jasprit bumrah taken five wickets in mi vs kkr match ipl 2022 prd

Next Story
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू सूर्यकुमार यादव आयपीएलमधून बाहेर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी