scorecardresearch

४, ६, ६, ६, ६…, मुंबईच्या बेबी एबीची तुफानी फलंदाजी, पंजाबचे खेळाडू बघतच राहिले

बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाल्ड ब्रेविसने तर पंजबाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

deval brevis
देवाल्ड ब्रेविसने तुफानी फलंदाजी केली. (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २३ वा सामना चांगलाच रोहमर्षक झाला. या सामन्यात पंजबानने दिलेले १९९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईच्या फलंदाजांनी पूर्ण ताकदीने फलंदाजी केली. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाल्ड ब्रेविसने तर पंजबाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

हेही वाचा >>> रोहित शर्माने रचला इतिहास, ‘हा’ विक्रम नोंदवणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सलामीला येऊन चांगली सुरुवात केली. मात्र तो २८ धावा करुन झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या देवाल्ड ब्रेविसने मात्र पंजबाच्या गोलंदाजांची पिसं काढली. मुंबईची ६४ धावांवर दोन गडी बाद अशी स्थिती असताना नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या दीपक चहरची ब्रेविसची चांगलीच धुलाई केली. पहिल्या चेंडूवर तिलव वर्माने एक धाव केल्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या ब्रेविसने दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर पुढच्या चारही चेंडूंवर ब्रेविसने एकापाठोपाठ चार षटकार लगावले. या तुफानी खेळीमुळे दीपकच्या षटकातून मुंबईला २९ धावा मिळाल्या.

हेही वाचा >>> IPL 2022 : हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, आकाश दीप झाला शून्यावर बाद, अंबाती रायडूची एकच चर्चा

दरम्यान, सुरुवातीपासून तुफानी खेळ करुनही देवाल्डचे अर्धशतक हुकले. देवाल्ड ४९ धावांवर ओडेन स्मिथच्या चेंडूवर झेलबाद झाला. अर्षदीप सिंगने त्याचा झेल टिपला. ब्रेविसनंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने मुंबईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबईचा १२ धावांनी पराभव झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai indians players dewald brevis played fabulous in pbks vs mi ipl 2022 match prd