MI vs LSG Highlights Naveen Ul Haq Video: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान, नवीन-उल-हकने बुधवारी रात्री 2023 इंडियन प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. रोहित शर्मा (11), सूर्यकुमार यादव (33) आणि कॅमेरून ग्रीन (33) यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेत नवीनने मैदान गाजवले. नवीन उल हक दमदार गोलंदाजीसह विराट कोहलीशी झालेल्या भांडणामुळे सुद्धा यंदा चर्चेत राहिला होता. अगदी आरसीबी आयपीएलमधून बाहेर पडेपर्यंत नवीन सतत विराटला डिवचत होता आणि आता कालच्या सामन्यात त्याने चक्क आपल्याच संघातील के. एल. राहुलची कॉपी केल्याचे दिसून आले.

रोहितने कव्हरवर आयुष बडोनीकडे एक सरळ झेल दिल्यानंतर, नवीनने मैदानात अशी काही कृती केली ज्याने तुम्हालाही एलएसजीचा पहिल्या संघाचा कर्णधार केएल राहुल आठवेल. के. एल. राहुलने शतकपूर्ण केल्यावर मैदानात कानात बोट घालून एक प्रतिकात्मक कृती केली होती. काल नवीनने सुद्धा एक दोन नव्हे तर तीन वेळा मैदानात अशीच कृती करून मुंबई इंडियन्सला चिडवण्याचा प्रयत्न केला. रोहितच्या पाठोपाठ सामन्याच्या 11व्या षटकात फॉर्ममध्ये असलेल्या कॅमेरून ग्रीनला बाद केल्यानंतर नवीनने हे सेलिब्रेशन पुन्हा करून दाखवले.

child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
MS Dhoni removed his helmet when fans asking for it
चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Orangutang visits the house viral video
Video : ओरँगउटांगने घरात शिरून आधी हात धुतले, नंतर… माकडाच्या ‘या’ करमातींनी व्हाल चकित

नवीनच्या सेलिब्रेशनने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मग मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी सुद्धा नवीनची फिरकी घेत यावर ट्वीट व पोस्ट्स केल्या आहेत. यावर नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया पाहूया…

हे ही वाचा<< हार्दिक पांड्याला ८ धावांमध्ये आउट करण्यासाठी MS धोनीचा ‘तो’ एक इशारा… मॅच बदलणारा Video मिस करू नका

दरम्यान, आयपीएलमध्ये आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १८२ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनऊचा संघ केवळ १०१ धावाच करू शकला. या पराभवामुळे लखनऊचा आयपीएल २०२३मधील प्रवास संपला आहे.