Nitish Rana will lead KKR: दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. संघाचा युवा खेळाडू नितीश राणा संघाची धुरा सांभाळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे.

अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या घरच्या कसोटी सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठीही उतरला नाही. पाठदुखीमुळे तो आयपीएलचे पहिले काही सामने खेळू शकणार नाही. पाठदुखीतून बरा झाल्यानंतर तो संघात सामील होणार आहे.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्सचा सातवा कर्णधार असेल. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ १४ सामने खेळला आहे. यातील ६ सामने जिंकले आहेत, तर ८ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय सौरभ गांगुली, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि इऑन मॉर्गन यांनीही कोलकाता नाईट रायडर्सची कमान सांभाळली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली एकूण १०८ सामने खेळले गेले, त्यापैकी ६१ सामने जिंकले, तर ४६ सामने हरले.

संघाचा युवा खेळाडू नितीश राणाने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तो संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. गेल्या मोसमात त्याची बॅट जोरदार चालली. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याने ९१ सामन्यात १३४.२२च्या स्ट्राईक रेटने २१८१ धावा केल्या आहेत. त्यात १५ अर्धशतकांचाही समावेश आहे.

पहिला सामना १ एप्रिल रोजी –

३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या मोसमातील कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला सामना १ एप्रिलला होणार आहे. हा सामना मोहालीच्या आय बिंद्रा स्टेडियमवर दुपारी ३:३० पासून खेळवला जाईल. या सामन्यात संघाचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. सध्याच्या आयपीएलमधील हा पहिला डबल हेडर सामना असेल.

हेही वाचा – IPL 2023: स्टीव्ह स्मिथची आयपीएलमध्ये एन्ट्री! २०२२च्या लिलावात राहिला होता अनसोल्ड, आता ‘या’ संघात होणार सहभागी

आयपीएल २०२३ साठी केकेआर संघ:

श्रेयस अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगताप, नारायण वायदे, हर्षित राणा. अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, साकिब अल हसन.