scorecardresearch

पॅट कमिन्स-शिवम मावी जोडी ठरली भारी ! दोघांनी मिळून टिपला अप्रतिम झेल, रियान परागला केलं ‘असं’ बाद

नरेनने टाकलेल्या चेंडूवर रियान परागने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत उंच गेल्यामुलळे तो सीमारेषेच्या बाहेर गेला नाही.

pat cummins and shivam mavi
पॅट कमिन्स आणि शिवम मावी यांनी अप्रतिम झेल टिपला (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ३० व्या सामन्यात जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकाताच्या खेळाडूंनी राजस्थानच्या रियान परागला अप्रतिमरित्या झेलबाद केलंय. केकेआरच्या शिवम मावी आणि पॅट कमिन्स या जोडीने उत्तम ताळमेळ दाखवत सीमारेषेवर रियान परागचा झेल टिपला आहे. दोघांनी टिपलेला हा झेल आयपीएलच्या या हंगामातील सर्वोत्तम झेल असल्याचे म्हटले जातेय.

हेही वाचा >> दिल्लीच्या ताफ्यात तिघांना करोना, IPL पुन्हा रद्द होणार ? जाणून घ्या नवे नियम

राजस्थान रॉयल्सच्या १८९ धावा झालेल्या असताना कोलकाता नाईट रायडर्सला विकेटचा शोध होता. त्यामुळे सुनिल नरेनच्या हाती चेंडू सोपवण्यात आला. नरेनने टाकलेल्या चेंडूवर रियान परागने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत उंच गेल्यामुलळे तो सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. तर दुसरीकडे हवेत गेलेला चेंडू पाहून पॅट कमिन्स आणि शिवम मावी ही जोडी झेल टिपण्यासाठी चेंडूजवळ गेली. अगोदर पॅट कमिन्सने चेंडू अचूक टिपला. मात्र तोल सांभळता न आल्यामुळे त्याने चेंडू समोर असलेल्या शिवम मावीकडे फेकला.

हेही वाचा >> IPL 2022 : केविन पिटरसनला भारताची भुरळ, IPL मध्ये करणार समालोचन, हिंदीत खास ट्विट करत म्हणाला…

शिवम मावीनेदेखील दक्ष राहत पॅट कमिन्सने फेकलेला चेंडू अचूक पद्धतीने झेलला. ज्यामुळे सीमारेषेवर चेंडू टिपल्यामुळे रियान परागला अवघ्या पाच धावावंर तंबुत परतावं लागलं. पॅट कमिन्स आणि शिवम मावी या जोडीने टिपलेला हा झेल या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा >> IPL 2022 : दिल्ली कॅपिट्लसच्या ताफ्यात आणखी दोघांना करोनाची लागण, परदेशी खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह

दरम्यान राजस्थान रॉयल्सने वीस षटकांत २१७ धावांचा डोंगर उभा केला. जोस बटलरने शतकी खेळी करत १०३ धावा केल्या. ६१ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ५ षटकार लगावत बटलरने ही किमया केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pat cummins and shivam mavi brilliant catch of riyan parag in rr vs kkr ipl 2022 match prd

ताज्या बातम्या