People Garba Dance In Narendra Modi Stadium Video Viral : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील सर्वात महत्वाचा म्हणजेच फायनलचा सामना आज राखीव दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा रंगतदार सामना सुरु आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या सलामीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. शुबमन गिलने ३९ तर ऋद्धीमान साहाने ३९ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर साई सुदर्शनने धडाकेबाज फलंदाजी करून ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकून ९६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली.
या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. मात्र, नरेंद्र मोदी
इथे पाहा व्हिडीओ
साई सुदर्शनची धडाकेबाज फलंदाजी
साईने चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकार ठोकून ९६ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. तत्पूर्वी, साईच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मथिशा पाथिरानाने साईला बाद केलं.
मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.