23rd Season of IIFA Awards Show: आयपीएलच्या १६ व्या हंगामात जर एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीमुळे सर्वाधिक टीकेला सामोरे जावे लागले असेल, तर तो दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू पृथ्वी शॉ होता. आता लीग स्टेजसह संघाचा प्रवास संपल्यानंतर, शॉ पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड निधी तापडियासोबत सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसला आहे. २६ मे रोजी अबू धाबी येथे आयोजित आयफा अवॉर्ड शोमध्ये दोघांनी हजेरी लावली होती. आता त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड निधी तापडिया एक मॉडेल असून तिला अभिनयात करिअर करायचे आहे. या कार्यक्रमात दोघेही काळ्या कपड्यात दिसले. जिथे पृथ्वी शॉने जॅकेट आणि शर्टसोबत काळ्या रंगाची जीन्स घातली होती. तर निधीने काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. दोघेही खूप सुंदर कपल एकत्र दिसत होते.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य

पृथ्वी शॉसाठी यंदाचा आयपीएल हंगाम चांगला राहिला नाही –

दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग असलेल्या पृथ्वी शॉसाठी, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट आयपीएल हंगाम आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे, शॉला संघ व्यवस्थापनाने काही सामन्यांनंतर प्लेइंग इलेव्हनमधून वगळले. मात्र, हंगामाच्या शेवटी शॉला काही सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याला पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळता आली.

हेही वाचा – IPL 2023: आयपीएल फायनलपूर्वीच गुजरातने चेन्नईला टाकले मागे, मोडला ९ वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम

या हंगामात २३ वर्षीय पृथ्वी शॉ ८ सामन्यात केवळ १०६ धावा करू शकला. शॉचा खराब फॉर्म पाहता भारतीय संघात पुनरागमन करणे त्याच्यासाठी सोपे काम असणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत काही युवा खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते. यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची नावे शर्यतीत आघाडीवर आहेत.