Prithvi Shaw Break Silence After Unsold in IPL 2025 Auction: भारतीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. IPL 2025 साठी झालेल्या लिलावात शॉ साठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. एक काळ असा होता जेव्हा पृथ्वी शॉ ला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जायचे. पण कालांतराने पृथ्वीच्या कामगिरीतही घसरण होत गेली आणि तो अनेक अनावश्यक कारणांमुळे चर्चेत राहिला. पृथ्वी शॉ त्याच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकवेळा ट्रोलच्या निशाण्यावर आला होता. सातत्याने ट्रोल होत असलेल्या शॉ ने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Focused Indian नावाच्या युट्युब चॅनेलवरून शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये बोलताना पृथ्वी शॉ ट्रोलला कसं सामोरा जातो हे सांगितलं आहे. पृथ्वी म्हणाला, “जर एखादी व्यक्ती मला फॉलोच करत नसेल तर ते मला ट्रोल कसे काय करू शकतात? याचा अर्थ तो माझ्यावर लक्ष ठेवून आहे, छान…”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Rishabh Pant: ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा

ट्रोलिंगचा सामना करताना काही वेळेस मीम्स पाहताना दुखही होतं हे सांगताना पृथ्वी म्हणाला, “मला वाटतं ट्रोल करणं ही फार चांगली गोष्ट नाहीय, पण ही वाईट गोष्टही आहे नाहीय. जर लोक माझ्यावर मीम्स बनवतात, मी ते पाहतो. पण काहीवेळेस मला ते पाहून दु:ख होतं.”

यानंतर पृथ्वी शॉ त्याच्या २५ व्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचत असताना चा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावरूनही त्याला ट्रोल केलं गेलं, त्याबद्दल बोलताना पृथ्वी म्हणाला, “नुकताच माझा वाढदिवस होता. मी माझे कुटुंब आणि मित्रांबरोबर सेलिब्रेशन करत होतो, पण मला ट्रोल करण्यात आलं, कारण पृथ्वी शॉ सराव करत नव्हता तर पार्टी करत होता. जेव्हा मी हे सर्व ऐकलं तेव्हा मला वाटले की मी वर्षभर सामन्यांसाठी सराव करतो, मी वर्षातील एक दिवसही माझ्या आनंदासाठी जगू शकत नाही का?”

हेही वाचा – Fastest T20I Century: IPL लिलावात Unsold अन् आता २८ चेंडूत शतक! ‘या’ खेळाडूने मोडला ऋषभ पंतचा मोठा विक्रम

पृथ्वी शॉ एकेकाळी भारताच्या सर्वात शक्तिशाली फलंदाजांमध्ये गणला जात असे. पृथ्वी शॉने आपल्या कसोटी पदार्पणात शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरनंतर कसोटी शतक झळकावणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय ठरला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना शॉने एका षटकात ६ चौकारही मारले आहेत. त्याने भारतीय अंडर-१९ संघाचे नेतृत्वही केले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर-१९ संघाने २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता.

हेही वाचा – ICC Test Rankings: बुमराह नंबर वन कसोटी गोलंदाज, यशस्वी जैस्वालची कारकिर्दीतील उत्कृष्ट रँकिंग, ICC क्रमवारीत भारताचा दबदबा

सध्या पृथ्वी शॉ खराब फॉर्मशी झुंज देत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर टिप्पणी करताना एका व्यक्तीने म्हटले की, तू तुझी फलंदाजी आणि फिटनेसकडे लक्ष द्या, तू कोणाचा बॅकअप खेळाडूही नाही. तर शुबमनसारखे तुझ्या वयाचे खेळाडू गुजरातचे कर्णधारपद सांभाळत आहेत आणि अभिषेक हा एसआरएचचा मुख्य फलंदाज आहे आणि तो यापूर्वी तुझ्या हाताखाली खेळला आहे. आता तुला वास्तव कळेल अशी आशा आहे.

Story img Loader