scorecardresearch

ऋषी धवनचे तब्बल ६ वर्षांनी कमबॅक, पहिल्याच सामन्यात तळपला, पण चेहऱ्यावर नेमकं काय लावलं होतं ?

ऋषी धवनने त्याच्या पहिल्याच सामन्यात भेदर मारा करत गोलंदाजी केली. या संपूर्ण सामन्यात धवनने चेहऱ्यावर फेस शिल्ड लावली होती.

Rishi Dhawan
ऋषी धवन (फोटो- iplt20.com)

पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेली लढत अनेक अर्थांनी स्मरणीय ठऱली. या सामन्यात पंजाबच्या शिखर धवनने सहा हजार धावा पूर्ण केल्या. याच सामन्यात पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन याने तब्बल सहा वर्षांनी दमदार कमबॅक केले आहे. त्याला फलंदाजी करण्याची संधी भेटली नसली तरी गोलंदाजीमध्ये त्याने दुसऱ्याच षटकात शिवम दुबेचा त्रिफळा उडवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऋषी धवनच्या या कामगिरीची तसेच त्याने चेहऱ्यावर लावलेल्या फेस शिल्डचीही चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा >> PBKS vs CSK : पंजाबच्या गब्बरची धडाकेबाज खेळी, एकाच सामन्यात धवनने रचले दोन मोठे विक्रम !

ऋषी धवनने तब्बल सहा वर्षांनंतर पदार्पण केले आहे. याआधी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळलेला आहे. मात्र २०१६ नंतर तो आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळतोय. २०१६ साली त्याने पंजाब किंग्जकडूनच फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. आता पुन्ह एकदा त्याने आजच्या सामन्यातून पंजाबसाठी खेळण्यास सुरुवात केली. या सामन्यात त्याने टाकलेल्या दुसऱ्याच षटकात चेन्नईचा शिवम दुबे त्रिफळाचित झाला. त्याने घेतलेल्या या बळीची चांगलीच चर्चा झाली. पदार्पणातच विकेट घेतल्यामुळे त्याची वाहवा होत आहे.

हेही वाचा >> सामना पंजाबचा, पण चर्चा मात्र मालकिणीची; प्रीति झिंटाने वेधले सर्वांचे लक्ष

ऋषी धवनने चेहऱ्यावर काय लावलं ?

ऋषी धवनने त्याच्या पहिल्याच सामन्यात भेदर मारा करत गोलंदाजी केली. या संपूर्ण सामन्यात त्याने चेहऱ्यावर फेस शिल्ड लावली होती. मैदानावर चपळाईने वावरणाऱ्या ऋषीने चेहऱ्यावर काय लावले ? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता. या प्रश्नाचे उत्तर खुद्द ऋषी धवननेच सामना सुरु होण्यापूर्वी दिले आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सामने सुरु होण्यापूर्वी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. यावेळी सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्याला लागले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच कारणामुळे आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो पंजाब किंग्जच्या संघामध्ये दिसला नाही. ऋषी धवनवर नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू लागू नये किंवा इतर कसलीही इजा होऊ नये म्हणून त्याने फेस शिल्ड लावली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab kings rishi dhawan wore face shield to protect his nose and face in pbks vs csk ipl 2022 match prd

ताज्या बातम्या