IPL 2023, PBKS vs KKR Cricket Score Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा दुसरा सामना आज मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नीतीश राणाच्या नेतृत्वात कोलकाताचा संघ पंजाब किंग्जशी भिडण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, मैदानात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. भानुका राजपक्षेनं वादळी अर्धशतक ठोकलं. तर कर्णधार शिखर धवनने ४० धावांची खेळी साकारली. त्यामुळे पंजाबने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी १९२ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

पंजाब किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. सिंगने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊदीने सिंगला २३ धावांवर असताना झेलबाद केलं आणि पंजाबला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर भानुका राजपक्षेने आक्रमक खेळी करत पॉवर प्ले मध्ये पंजाबला ५० धावांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतरही भानुकाने मोठे फटके मारत ३२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, उमेश यादवच्या गोलंदाजीवर राजपक्षे ५० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि जितेश शर्माने पंजाबची कमान सांभाळली.

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 RCB vs LSG Match Updates in Marathi
RCB vs LSG : मयंकच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीचे फलंदाज हतबल, लखनऊने २८ धावांनी नोंदवला दुसरा विजय
RCB vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 : क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकाच्या जोरावरने लखनऊने उभारला धावांचा डोंगर, आरसीबीसमोर ठेवले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

मात्र, जितेश शर्माला पंजाब किंग्जसाठी मोठी खेळी करता आली नाही. जितेश ११ चेंडूंचा सामना करत २१ धावांवर खेळत असताना टीम साऊदीने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर शिखरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण शिखरलाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना वरुण चक्रवर्तीने ४० धावांवर बाद केलं आणि कोलकाताला ब्रेक थ्रू मिळाला. त्यानंतर पंजाबच्या सिकंदर रजा आणि सॅम करनने सावध खेळी केली. पंरतु, सुनील नारायणने सिकंदर रजाला १६ धावांवर असताना बाद केलं आणि पंजाबला पाचवा धक्का दिला. सॅम करनने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.