IPL 2023, PBKS vs KKR Cricket Score Update : आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा दुसरा सामना आज मोहालीत ब्रिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने कोलकाताच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी सर्वस्व पणाला लावलं. कोलकाताने १६ षटकांत सात विकेट्स गमावत १४६ धावा केल्या होत्या. विजयासठी कोलकाताना ४ षटकांत २४ धावांची गरज होती. पंरतु पावसाने सामन्यात खोडा घातल्याने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पंजाबचा ७ धावांनी विजय झाला.

आंद्रे रसेल आणि व्येंकटेश अय्यरने आक्रमक खेळी केली. परंतु, धावांचं लक्ष्य गाठताना कोलकाताच्या फलंदाजांची दमछाक झाली. कारण अर्शदीप सिंगने गोलंदाजीचा भेदक मारा करून कोलकाताच्या तीन फलंदाजांना बाद केले. पंजाबने दिलेलं १९२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी कोलकाताचे सलामीवीर फलंदाज मनदीप सिंग आणि रहमानउल्ला गुरबाज मैदानात उतरले होते. गुरबाजने सुरुवातीच्या काही षटकांत मोठे फटके मारत कोलकाताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पण मनदीपला धावांचा सूर गवसला नाही. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर मनदीप अवघ्या दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर गुरबाजला नॅथन एलिसने २२ धवांवर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर आंद्रे रसेलने चौफेक फटकेबाजी करत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं १९ चेंडूत ३५ धावा कुटल्या. पण सॅम करनाच्या गोलंदाजीवर रसेल झेलबाद झाला. त्यानंतर अय्यर अर्शदीपच्या गोलंदाजीवर ३४ धावांवर बाद झाला.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

नक्की वाचा – PBKS vs KKR: पन्नाशीच्या शिखरावर असताना वरुण चक्रवर्तीनं धवनला गुंडाळलं, ‘त्या’ षटकात उडवला त्रिफळा, पाहा Video

गुरुबाज बाद होताच कोलकाताचा फलंदाज अनुकुल रॉय फक्त ४ धावांवर असताना अर्शदीपच्या गोलंदाजीचा शिकार झाला अन् तंबूत माघारी परतला. कोलकाताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार नितीश राणाने सावध खेळी केली. पण नितीश १७ चेंडूत २४ धावांवर खेळत असताना सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. नितीशच्या पाठोपाठ रिंकू सिंगही बाद झाला आणि कोलकाताला पाचवा धक्का बसला.

पंजाब किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या प्रभसिमरन सिंगने सुरुवातीच्या षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी केली. सिंगने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२ चेंडूत २३ धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊदीने सिंगला २३ धावांवर असताना झेलबाद केलं आणि पंजाबला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर भानुका राजपक्षेने आक्रमक खेळी करत पॉवर प्ले मध्ये पंजाबला ५० धावांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतरही भानुकाने मोठे फटके मारत ३२ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र, उमेश यादवच्या गोलंदाजीवर राजपक्षे ५० धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि जितेश शर्माने पंजाबची कमान सांभाळली.

मात्र, जितेश शर्माला पंजाब किंग्जसाठी मोठी खेळी करता आली नाही. जितेश ११ चेंडूंचा सामना करत २१ धावांवर खेळत असताना टीम साऊदीने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर शिखरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण शिखरलाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना वरुण चक्रवर्तीने ४० धावांवर बाद केलं आणि कोलकाताला ब्रेक थ्रू मिळाला. त्यानंतर पंजाबच्या सिकंदर रजा आणि सॅम करनने सावध खेळी केली. पंरतु, सुनील नारायणने सिकंदर रजाला १६ धावांवर असताना बाद केलं आणि पंजाबला पाचवा धक्का दिला. सॅम करनने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.