मयंक अग्रवाल व अर्शदीप सिंग फक्त या दोघांना पंजाबनं रिटेन केलं आहे. संपूर्ण संघ नव्यानं बांधण्याचा प्रयत्न पंजाबनं केलेला आहे. मयंक सोबत भरवशाचा शिखर धवन डावाची सुरूवात करेल. जॉनी बेअरस्टो व लिआम लिव्हिंगस्टोन हे धडाकेबाज फलंदाज मधल्या फळीत आहेत. अंडर १९ वर्डकपमध्ये चमकलेला राज बावा पंजाबमध्ये आहे. शाहरूख खानला ९ कोटींची बोली लावून पंजाबनं घेतलं असून तो कदाचित फिनिशरच्या भूमिकेत दिसेल. ओडीन स्मिथ, कासिगो रबाडा व अर्शदीप तेज गोलंदाजी सांभाळतील तर राहुल चहर व हरप्रीत ब्रारवर फिरकीची जबाबदारी असेल.