आयपीएल २०२२ च्या ६६ व्या महत्त्वाच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने शतक झळकावले. चालू मोसमात शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी ३ शतके झळकावली आहेत आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने २ शतके झळकावली आहेत. डी कॉक चालू हंगामात लखनऊकडून खेळत आहे. त्याने ५९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शतक झळकावले आहे. आयपीएलमधील त्याचे हे दुसरे शतक आहे. त्याने २०१६  मध्ये पहिले शतक झळकावले होते. सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम खेळण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना संघाने नाबाद २१० धावा केल्या. केएल राहुलनेही अर्धशतक झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉकने आयपीएल २०२२ चे पहिले शतक ५९ चेंडूत ६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट १७१ पेक्षा जास्त होता. त्याने ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले असले तरी पुढच्या २३ चेंडूंमध्ये त्याने उर्वरित ५० धावा करत आयपीएलच्या इतिहासातील दुसरे शतक पूर्ण केले.

तिसरा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर

डी कॉकने आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. याआधी ख्रिस गेलने २०१३ मध्ये आरसीबीकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. त्याचवेळी ब्रेंडन मॅक्क्युलमने २००८ मध्ये केकेआरकडून खेळताना आरसीबीविरुद्ध नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. म्हणजेच तीन सर्वाधिक धावा करणारे फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिले आणि सलामीवीर म्हणून मैदानात उतरले.

दरम्यान, डी कॉक आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी २०१९ मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना आरसीबीविरुद्ध १८५ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Quinton de kock scored a century in the important match of ipl 2022 abn
First published on: 18-05-2022 at 21:41 IST