आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २० वा सामन्यात चांगलीच अटीतटीची लढत झाली. हा सामना राजस्थान रॉयल्सने तीन धावांनी जिकंला असून लखनऊ सुपर जायंट्सला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यात आयपीएलच्या इतिहासात अगोदर कधीही घडला नाही असा प्रकार समोर आला. आयपीएलच्या इतिहासात रविचंद्रन अश्विन हा रिटायर्ड आऊट होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. संघाच्या हितासाठी अश्विनने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा >>> चेन्नईच्या सततच्या पराभवानंतर रवी शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले जाडेजा नाही तर ‘हा’ खेळाडू हवा होता CSK चा कर्णधार

राजस्थान रॉयल्स संघ सामन्यामध्ये सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र या संघाची ६७ धावांमध्ये ४ गडी बाद अशी स्थिती झाली होती. जोस बटलर, सॅमसोन, पडिक्कल, तसेच वॅन दर डुसेन स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर मात्र शिमरोन हेटमायर आणि रवींचद्रन अश्विन यांनी अर्धशतकी भागिदारी केली. मात्र संघाच्या हितासाठी १९ व्या षटकात अश्विन २८ धावांवर रिटायर्ड आऊट झाला. त्यानंतर अश्विनच्या जागेवर रियान पराग मैदानावर आला. मात्र पराग फक्त आठ धावा करु शकला.

हेही वाचा >>> आयपीएलमध्ये पंचांकडून चुकांवर चुका, DC vs KKR सामन्यात खेळाडू वैतागले, नेमकं काय घडलं?

आर अश्विनला रियान परागच्या अगोदर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र अश्विनची या हंगामात फलंदाजीमधील कामगिरी तेवढी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे अश्विन रिटायर्ड आऊट होऊन त्याने रियान परागला संधी दिली. आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आऊट होणारा अश्विन पहिलाच फलंदाज ठऱला आहे.