IPL 2022, GT vs RR : क्वॉलिफायर-१ मध्ये संजू सॅमसनच्या नावावर नवा विक्रम, धोनीला टाकलं मागे

आज प्लेऑफच्या सामन्यांमध्ये क्वॉलीफायर-१ मध्ये राजस्थान आणि गुजरात यांच्यात लढत होत आहे.

sanju samson
संजू सॅमसन (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या १५ व्या हंगामातील क्वॉलिफायर-१ सामन्यात राजस्थान आणि गुजरात यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरले आहेत. सध्या गुजरात टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे सामना सुरु होण्याआधीच राजस्थानचा कर्णधार संजू सॅनसनच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकलं आहे.

हेही वाचा :महिला टी-२० चॅलेंज : महाराष्ट्राची माया सोनवणे तळपली, गोलंदाजी ठरतेय चर्चेचा विषय; पाहा व्हिडीओ

आज प्लेऑफच्या सामन्यांमध्ये क्वॉलीफायर-१ मध्ये राजस्थान आणि गुजरात यांच्यात लढत होत आहे. या सामन्याआधी गुजरात संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर संजू सॅमसनचा संघ फलंदाजीसाठी उतरला. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट फायनलमध्ये पोहोचेल. तर पराभूत झालेल्या संघाला पुन्हा एक संधी मिळेल. मात्र हा सामना सुरु होण्याआधीच राजस्थाचा कर्णदार संजू सॅमसन याच्या नावावर वेगळा विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. संजू सॅमसनने आयपीएलच्या या हंगामात एकूण १३ वेळा नाणेफेक गमावली आहे. तो एका हंगामामध्ये सर्वाधिक वेळा नाणेफेक गमावणारा कर्णधार ठरला आहे.

हेही वाचा : खुशखबर! २०२३च्या आयपीएल पर्वात बंगळुरुचं बळ वाढणार; एबी डिव्हिलियर्स पुन्हा येणार

याआधी हा विक्रम चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर होता. धोनीने आयपीएल २०१२ मध्ये एकूण १२ वेळा टॉस गमावला होता. टॉस गमावण्यात संजू सॅमसनने धोनीला मागे टाकलं आहे.

हेही वाचा : सामना सुरु असताना छातीत लागलं दुखायला, दिग्गज क्रिकेटपटूला केलं तातडीने रुग्णालयात दाखल

गुजरात टायटन्स संघाचे प्लेइंग इलेव्हन

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी

हेही वाचा : उमरान मलिकने टाकलेला चेंडू पोटाला लागला, दुखापतीमुळे मयंक अग्रवाल थेट जमिनीवरच झोपला

राजस्थान रॉयल्स संघाचे प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिककल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅक्कॉय

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan royals captain sanju samson loss toss for 13 times crossed ms dhoni prd

Next Story
IPL 2022, GT vs RR Highlights : गुजरात टायटन्स फायनलमध्ये, गुजरातवर सात गडी राखून मिळवला विजय
फोटो गॅलरी