आयपीएलच्या पंधराव्या हंगामातीला २२ व्या सामन्यात चेन्नईने बंगळुरुवर २३ धावांनी मात केली. सलग चार सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर चेन्नईला हा पहिलाच विजय मिळाला आहे. दरम्यान चेन्नईचा हा विजय कर्णधार रविंद्र जाडेजाने त्याच्या पत्नीला समर्पित केला आहे. या सामन्यात चेन्नई संघातील रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने बंगळुरुच्या गोलंदाजांची पिसं काढली होती.

हेही वाचा >>> ‘सगळे म्हणतात धोनीनं वर्ल्ड कप जिंकला; मग बाकीचे काय लस्सी पित होते?’ हरभजनचा संतप्त सवाल

“कर्णधारपद मिळाल्यानंतर चेन्नईचा हा पहिलाच विजय आहे. पहिला विजय हा नेहमीच खास असतो. त्यामुळे हा विजय मला माझ्या पत्नीला समर्पित करायचा आहे,” असं जाडेजानं म्हटलंय. तसेच हा विजय त्याने पत्नीसोबतच चेन्नई संघातील सर्वच खेळाडूंनाही समर्पित केलाय.

हेही वाचा >>> Video : माहीचा कूल अंदाज ! दोन कॅच सोडणाऱ्या मुकेश चौधरीला दिला दिलासा, खांद्यावर हात ठेवून…

“मागील चार सामन्यांमध्ये आम्हाला विजय मिळवता आला नाही. मात्र एक संघ म्हणून आम्हाला आता यश मिळाले आहे. फलंदाजीमध्ये सर्वच फलंदाजांनी चांगली खेळी केली. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे तर अप्रतिम खेळले. गोलंदाजांनीदेखील त्यांचे योगदान दिले” अशा शब्दात जाडेजाने पहिल्या विजयाबद्दल संघाची स्तुती केली.

हेही वाचा >>> “…तोपर्यंत मी लग्न करणार नाही”, RCB vs CSK सामन्यातील पोस्टर चर्चेत; चाहत्यांची RCB ला विनंती, “तिच्या भविष्याशी खेळू नका”

त्याचबरोबर चेन्नईची व्यवस्थापन टीम माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकत नाही. ते मला प्रत्येक वेळी प्रेरित करतात. अजूनही मी वरिष्ठ खेळाडूंकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय. महेंद्रसिंह धोनी इथे आहे. त्याच्याकडे जाऊन मी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत असतो, असेदेखील जाडेजाने सांगितले.

हेही वाचा >>> IPL : असे ४ भारतीय खेळाडू ज्यांनी रचला आयपीएलमध्ये विक्रम, लगावले २०० पेक्षा जास्त षटकार

दरम्यान, चेन्नई आणि बंगळुरु यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने बंगळुरुसमोर २१७ धावांचे आव्हान उभे केले होते. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने १६५ धावांची भागिदारी केली होती. तर बंगळुरुला या सामन्यात फक्त १९३ धावा करता आल्या.