scorecardresearch

Premium

IPL 2020 : चेन्नईचं कर्णधारपद जडेजानं सोडलं; पुन्हा धोनीच्या हातात नेतृत्वाची धुरा

आठ सामन्यांत सहा पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ravindra Jadeja returns MS Dhoni captaincy CSK big announcement

चेन्नई सुपर किंग्सचा नवा कर्णधार रवींद्र जडेजाने आयपीएल २०२२ मध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने आठ सामन्यांत सहा पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. जडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या प्रेस रिलीझनुसार “रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या हितासाठी नेतृत्व करण्याचे स्विकार केले आहे आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली आहे,” असे म्हटले आहे.

England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: इंग्लंडच्या संघाने केला विश्वविक्रम! वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादाच झाली ‘या’ खास पराक्रमाची नोंद
World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
Naseem Shah being ruled out of the World Cup due to injury
World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकचा वेगवान गोलंदाज नसीम शाह झाला भावूक, शेअर केली खास पोस्ट

महेंद्रसिंग धोनीने आयपीएल १५ सुरू होण्याच्या काही दिवस आधी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला ही जबाबदारी देण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला विजय मिळवला. तर दुसरा विजय मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravindra jadeja returns ms dhoni captaincy csk big announcement abn

First published on: 30-04-2022 at 19:30 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×