रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीने १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले आहे. आरसीबीने अंतिम फेरीत पंजाब किंग्सचा ६ धावांनी पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. आरसीबीचा विजय संघाने चाहत्यांनाही समर्पित केला आहे. विराट कोहली तर मैदानावरच रडताना दिसला. आता आरसीबी संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूला पोहोचणार आहे, जिथे संघाची विजयी परेड होणार आहे.

आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर, आरसीबीने आपल्या चाहत्यांसह हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी बेंगळुरूमध्ये भव्य विजय परेडची घोषणा केली आहे. ही परेड केवळ एक उत्सवच नाही तर संघ ज्यांना ‘१२ वा खेळाडू’ म्हणतो त्यांच्या सर्व चाहत्यांसाठी एक संस्मरणीय क्षण असणार आहे.

आरसीबीने बंगळुरूच्या रस्त्यांवर एका खास पद्धतीने हा विजय साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि ४ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता विजय परेड सुरू होणार असल्याची अपडेट दिली आहे.

आरसीबीची ही विक्ट्री परेड विधान सौधा येथून सुरू होईल आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर संपेल.. या मिरवणूकीत लाल रंगाची ओपन-टॉप बस असू शकते, जी आरसीबी खेळाडूंना घेऊन जाईल, जे अभिमानाने त्यांच्या हातातील ट्रॉफी उंचावतील. आरसीबीने ही परेड त्यांच्या चाहत्यांना समर्पित केली आणि म्हटले, ‘हा विजय तुमच्यासाठी आहे, १२ व्या खेळाडूंची फौज. प्रत्येक उत्साहासाठी, प्रत्येक अश्रूसाठी, प्रत्येक वर्षी. निष्ठा हीच खरी रॉयल्टी आहे आणि आज हा मुकुट तुमचा आहे.’

आरसीबीची आयपीएल २०२५ ची विजयी परेड टीव्हीवर कुठे लाईव्ह पाहता येणार?

आरसीबीची आयपीएल २०२५ ची विजयी परेड भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरसीबीची आयपीएल २०२५ ची विजय परेड अॅपवर लाईव्ह कुठे पाहता येणार?

आरसीबीची आयपीएल २०२५ ची विजय परेड जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह पाहता येणार