scorecardresearch

Video : जोस बटलर-रियान परागची एकच चर्चा, दोघांनी टिपला अप्रतिम झेल, कृणाल पांड्याला केलं ‘असं’ बाद

लखनऊविरोधातील सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी उत्तमरित्या क्षेत्ररक्षण केले. रियान पराग आणि जोस बटरल या जोडीने तर अप्रतिमरित्या झेल टिपला.

RIYAN PARAG AND JOS BUTLLER
रियान पराग आणि जोस बटरल यांनी अशा प्रकारे झेल टिपला. (iplt20.com)

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६३ वा सामना चांगलाच अटीतटीचा ठरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर २४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आता राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले आहे. खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केल्यामुळे या संघाला विजयाची गोडी चाखता आली. या सामन्यात रियान पराग आणि जोस बटलर या जोडीने तर नेत्रदीपक कामगिरी करत आश्चर्यकारकरित्या झेल टिपला.

हेही वाचा >> ठरलं! महिला टी-२० चॅलेंज २०२२ स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे; २३ मेपासून रंगणार थरार

लखनऊविरोधातील सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी उत्तमरित्या क्षेत्ररक्षण केले. रियान पराग आणि जोस बटरल या जोडीने तर अप्रतिमरित्या झेल टिपला. लखनऊचे ९४ धावांवर धावांवर तीन गडी बाद झाले होते. आधीच संघ संकटात सापडलेला असताना कृणाल पांड्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्याअगोदरच जोस बटलरने मोठी धाव घेत चेंडू हवेतच टिपण्याचा प्रयत्न केला. त्याने चेंडू हातात पकडला मात्र सीमारेषा ओलांडण्याच्या भीतीमुळे त्याने हातातील चेंडू समोर असलेल्या रियान परागकडे फेकला. विशेष म्हणजे रियान पगारनेही तत्परता दाखवून हवेत उंच उडी घेत चेंडू टिपला.

हेही वाचा >> गुजरात-चेन्नई संघाने अॅन्ड्र्यू सायमंड्सला वाहिली श्रद्धांजली, दंडाला बांधल्या काळ्या फिती

रियान पराग आणि जोस बटलर या दोघांनीही ताळमेळ साधत टिपलेल्या या झेलची चांगलीच चर्चा होत आहे. परिणामी कृणाल पांड्याला २५ धावांवरच तंबुत परतावे लागले. त्यानंतर प्रमुख फलंदाज बाद झाल्यामुळे पुढे लखनऊ संघाचा पराभव झाला. तर राजस्थान रॉयल्सचा २४ धावांनी विजय झाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Riyan parag jos buttler takes fabulous catch of krunal pandya in ipl 2022 psg vs rr match prd