Sunil Gavaskar On Rohit Sharma: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर राउंडमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करून दुसर्‍या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा ‘अंडरेटेड’ कर्णधार असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे. मधवालने घेतलेल्या विकेटसाठी सुद्धा गावसकर यांनी दाखले देत रोहित शर्माला श्रेय दिले आहे.

गावसकर यांनी इंडिया टुडेला सांगितले, “रोहितला त्याच्या हुशारीचे व डावपेचांचे पुरेसे श्रेय मिळत नाही. त्या’ माणसाच्या (रोहितच्या) नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत जी या लीगच्या इतिहासातील कोणत्याही फ्रँचायझीपेक्षा सर्वाधिक आहेत.”

Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

उदाहरणच पाहायचे तर, मधवालने आयुष बडोनीला ओव्हर द विकेट गोलंदाजी करून आउट केलं. डावखुऱ्या निकोलस पूरनला राउंड द विकेट बॉलने आउट केलं. बरेच गोलंदाज तसे करतातच असे नाही कारण एकदा त्यांना ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना लय गवसली असेल तर समोर डावखुरे फलंदाज असूनही ते स्वतःच्या गोलंदाजीत बदल करत नाहीतल. पण कर्णधाराने (रोहितने) राउंड द विकेट गोलंदाजी करून घेतली आणि त्यातून काय परिणाम प्राप्त झाले हे आपण पाहतोच आहोत.”

गावसकर पुढे म्हणाले की, हेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने केले असते तर लोकांनी त्याला डोक्यावर घेतले असते. जर हा सीएसकेचा संघ असता आणि धोनी कर्णधार असता तर प्रत्येकाने ‘धोनीने निकोलस पूरनला बाद करण्याचा कट रचला’ असे म्हटले असते. मोठ्या प्रमाणात हेच घडते. थोडासा हाईप देखील आहे, काही वेळा गोष्टी कामी येतात.”

“मधवालच नाही तर नेहल वढेराला त्यांच्या डावात एक प्रभावशाली खेळाडू म्हणून सिद्ध करण्यातही रोहितचा वाटा आहे. त्याने १२ चेंडूत २३ धावा केल्याने एमआयने आव्हानात्मक १८२/८ चे लक्ष्य देऊ केले. रोहितला याचेही श्रेय मिळायला हवे” असे पुढे गावसकर यांनी म्हटले.