MI Vs LSG Highlights Video: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १८२ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात लखनऊचा संघ केवळ १०१ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सच्या दमदार विजयात फलंदाजांसह आकाश मधवालने घेतलेल्या पाच विकेट्स महत्त्वाच्या ठरल्या. या विजयांनंतर एकीकडे गौतम गंभीर, नवीन उल हक आणि लखनौच्या संघाचा चेहरा उतरला होता तर मुंबईच्या संघात व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये सेलिब्रेशन सुरु झाले होते.

मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया

रोहित शर्मा म्हणाला की, “गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही तेच केले आहे. आम्ही जे केले ते लोक आमच्याकडून करण्याची अपेक्षा करत नाहीत, परंतु आम्ही यशस्वी झालो.”

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
IPL 2024 CSK vs GT Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
IPL 2024, SRH vs MI: हार्दिकच्या मुंबईसमोर पॅट कमिन्सच्या हैदराबादचे आव्हान, वाचा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: …आणि रोहित शर्मा पंड्याला म्हणाला, “कोण? मी?”, हार्दिकच्या ‘या’ कृतीवर चाहत्यांचा संताप; पाहा नेमकं काय घडलं मैदानात!

“आमची फलंदाजी खरोखरच चांगली झाली आहे. गेल्या सामन्यात [क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत] आमचा खेळ खूपच खराब झाला. मधवाल अप्रतिम आहे, ज्या क्षणी तो आला, आम्हाला कळले की तो कमाल करणार आहे. गुजरात सर्वोत्तम संघ आहे. हे एक कठीण आव्हान होते,” असे कॅमेरॉन ग्रीन म्हणाला.

सचिन तेंडुलकर व अंबानी कुटुंबाचे सेलिब्रेशन

आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सच्या मॅचनंतर कर्णधार रोहित शर्मापासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत, तसेच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी आणि नीता अंबानी सगळेच सेलिब्रेशनमध्ये दंग दिसून आले. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या अनमोल क्षणाचा व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स हायलाईट्स (MI Vs LSG Highlights)

प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि कंपनीने एलिमिनेटरमध्ये पांड्या ब्रदरच्या संघाविरुद्ध आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादव (३३), कॅमेरॉन ग्रीन (४१) आणि टिळक वर्मा (२६) यांच्या खेळींनी एमआयला २० षटकांत १८२/८ पर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात, लखनऊ सुपर जाएंट्सचा खेळ १६.३ षटकात १०१ धावांवर गुंडाळला, वेगवान गोलंदाज मधवालच्या पाच विकेट्सने, लखनऊची जागतिक दर्जाची फलंदाजी लाईनअप उद्ध्वस्त केली.

हे ही वाचा<< नवीन उल हकचा आता रोहित शर्मा- सूर्या- कॅमरूनशी पंगा! चिडवत केला ‘हा’ इशारा, Video पाहून फॅन्स म्हणतात, “हिंमत..”

मधवालने एकाच षटकात आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेत एमआयला ड्रायव्हिंग सीटवर बसवले. अनिल कुंबळेच्या आयपीएलमधील मोठ्या पराक्रमाची बरोबरी करण्यासाठी उत्तराखंडच्या वेगवान गोलंदाजाने पाच विकेट्स घेतल्या. या विजयासह, रोहितच्या MI ने IPL २०२३ च्या क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. तर शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL २०२३ च्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबईची गुजरात टायटन्सशी गाठ पडेल