Workload Management by Rohit Sharma: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे. कारण संघ जूनमध्ये इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर आशिया चषकही होणार आहे आणि एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. अशा स्थितीत खेळाडूंवर वर्कलोड मॅनेजमेंट करणे, अत्यंत महत्त्वाचे ठरते. दरम्यान, मुंबई इंडियन्स कडवट घोट घेऊ शकतात, अशी बातमी आहे. कर्णधार रोहित शर्मा काही सामन्यांमधून बाहेर बसू शकतो. रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा कर्णधार असून तो यापूर्वी बऱ्याचदा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता कोणत्याही किंमतीत, त्याला महत्वाच्या प्रसंगी जखमी होणे चालणार नाही. इंडियन एक्सप्रेसच्या वत्तानुसार, रोहित शर्मा या आयपीएलमध्ये कोणते सामने खेळायचे आणि कोणते खेळायचे याबद्दस निवड करेल. यादरम्यान, सर्वोत्तम टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला मार्गदर्शन करेल - मात्र, रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत असणार आहे. त्याचबरोबर तो डगआउटमधून सूर्यकुमार यादवला मार्गदर्शन करत राहील. अलीकडच्या काळात खेळाडूंच्या दुखापती ही टीम इंडियासाठी समस्या बनली आहे. जसप्रीत बुमराह बराच काळ मैदानापासून दूर आहे. रवींद्र जडेजाही नुकताच ६ महिन्यांनंतर मैदानात परतला. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने म्हटले होते की विश्वचषक पाहता, राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आयपीएल दरम्यान भारतीय खेळाडूंच्या कामाच्या भाराची काळजी घेईल. राष्ट्रीय कर्तव्यासाठी तंदुरुस्त राहणे महत्वाचे - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर रोहित शर्मा म्हणाला होता की, आयपीएलमध्ये त्यांच्या फ्रँचायझींसाठी खेळताना राष्ट्रीय कर्तव्यासाठी तंदुरुस्त राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणे, हे खेळाडूंवनर अवलंबून आहे. तो म्हणाला होता की, “हे आता फ्रेंचायझीवर अवलंबून आहे. ते आता खेळाडूंचे मालक आहेत. आम्ही संघांना काही संकेत दिले आहेत, परंतु शेवटी ते फ्रँचायझींवर अवलंबून आहे. महत्त्वाचे म्हणजे ते खेळाडूंवरही अवलंबून आहे. त्यांना त्यांच्या शरीराची काळजी घ्यावी लागेल. जर त्यांना वाटत असेल की वर्कलोड खूप होत आहे, तर ते याबद्दल बोलू शकतात. तसेच एक किंवा दोन सामन्यातून ब्रेक घेऊ शकतात. मला शंका आहे की असे होईल." मुंबई इंडियन्स संघ - कॅमेरॉन ग्रीन, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकेन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन यान्सन, ट्रिस्टन स्ट्रब्स आणि विष्णू विनोद.