रोव्हमन पॉवेलच्या विजयी षटकारासह राजस्थानने आऱसीबीवर ४ विकेट्यने मोठा विजय मिळवला. यासह आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे आरसीबीचे स्वप्न यंदाही भंगले आहे, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायरची भागीदारी राजस्थान रॉयल्स संघाने ४ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थानचा संघ आय़पीएल २०२४च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्समधील जो संघ जिंकेल तो संघ केकेआऱविरूद्ध अंतिम सामन्यात खेळेल. आरसीबीनेही एलिमिनेटर सामन्यात अटीतटीची लढत दिली पण संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ८ गडी गमावून १७२ धावा केल्या. रजत पाटीदार ३४, लोमरोर ३२, तर विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. राजस्थानकडून आवेश खानने ३ विकेट घेतल्या. अश्विनने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने काही विकेट्स गमावल्या, परंतु सामना ४ विकेटने जिंकण्यात यश मिळविले.

रियान पराग आणि हेटमायरने ग्रीनच्या षटकात चांगल्याच धावा केल्या. यासह सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. यशस्वी जैस्वाल आणि कोहलर कॅडमोरने संघाला चांगली सुरूवात करून दिली. जैस्वालने यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ४५ धावांची खेळी खेळली. रियान परागने ३६ आणि सिमरन हेटमायरने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यशस्वी जैस्वालची विकेट गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला तिसरा धक्का कर्णधार सॅमसनच्या रूपाने बसला ज्याने केवळ १७ धावांची इनिंग खेळल्यानंतर आपली विकेट गमावली. यानंतर ११२ धावांवर राजस्थान संघाला चौथा धक्का ध्रुव जुरेलच्या रूपाने बसला जो ८ धावांवर धावबाद झाला. येथून रियान परागने एका टोकापासून डाव सांभाळत शिमरॉन हेटमायरच्या साथीने ५व्या विकेटसाठी २५ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली आणि सामना पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने वळवला.

हेही वाचा – विराट कोहलीने एलिमिनेटर सामन्यात रचला इतिहास, २९ धावा पूर्ण करताच ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

मात्र, आरसीबीने रियान परागला राजस्थान १५७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर १६० धावांवर हेटमायरला पाठवून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रोव्हमन पॉवेलने राजस्थान संघाला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी पार पाडली आणि ८ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी करत आयपीएलच्या १७व्या मोसमात आरसीबीचा प्रवास संपवला. आरसीबीसाठी या सामन्यात मोहम्मद सिराजने २ तर लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी १-१ विकेट घेतली.

तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो संघाच्या चांगलाच पथ्यावर पडला. गोलंदाजांच्या शानदार प्रयत्नामुळे राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आठ विकेट्सवर १७२ धावांवर रोखले. आरसीबीच्या फलंदाजांना नियमित अंतराने बाद करत मोठी भागीदारी रचू दिली नाही. याआधीच्या सामन्यांमध्ये बराच काळ विकेट न घेतलेल्या अनुभवी रविचंद्रन अश्विनने १९ धावांत दोन विकेट घेतले. जे फारच महत्त्वाचे ठरले. त्याने चांगली गोलंदाजी करत कॅमेरॉन ग्रीन (२७) आणि ग्लेन मॅक्सवेल (०) यांचे सलग चेंडूंवर विकेट घेतले, त्यानंतर आवेश खानने ४४ धावांत तीन विकेट घेतले.

या पराभवासह आरसीबीचा संघ आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. सलग सहा सामने जिंकत केलेल्या विलक्षण पुनरागमनासह आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचला. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा संघ पराभूत झाला असला तरी त्यांचं हे पुनरागमन सर्वांच्या लक्षात नक्कीच राहिल.