Sandeep Sharma may replace Mohammed Shami : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ३८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. राजस्थानच्या या विजयात संदीप शर्माने ५ विकेट्स घेऊन तर यशस्वी जैस्वालने नाबाद शतक झळकावत महत्त्वाची भुमिका बजावली. यासह राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला संदीप शर्माने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला दावा मजबूत केला आहे.

राजस्थानचा मुंबईवर ९ विकेट्सनी विजय –

राजस्थान रॉयल्सने प्रथम मुंबई इंडियन्सला वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ९ बाद १७९ धावांवर रोखले. हे लक्ष्य राजस्थानने १८.४ षटकांत १ बाद १८३ धावा करून पार केले. यशस्वी-जॉस बटलर यांनी ४८ चेंडूंत ७४ धावांची सलामी दिल्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत ६५ चेंडूंत नाबाद १०९ धावांची भागीदारी करत संघाचा विजय निश्चित केला. या दरम्यान यशस्वी जैस्वालने ६० चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. तत्पूर्वी वेगवान गोलंदाज संदीप शर्माने दमदार गोलंदाजी करताना पहिल्या दोन षटकांत प्रत्येकी एक विकेट घेतल्या होती. त्यानंतर अखेरच्या षटकात तीन विकेट्स घेत एकूण ५ विकेट्स घेतल्या.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Jake Fraser Mcgurk Statement on Jasprit Bumrah
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”

मोहम्मद शमी पायाच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर –

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या टाचेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या कारणामुळे तो आयपीएलचा १७वा हंगाम खेळत नाहीये. शमी आयपीएल २०२४ नंतर सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शमीची सध्या रिकव्हरी सुरू आहे. दरम्यान, भारतीय संघाला शमीची जागी दुसरा बदली खेळाडू मिळाला आहे. संदीप शर्मा हा २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतो. कारण तो आयपीएल २०२४ हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी दमदार प्रदर्शन करत आहे.

हेही वाचा – IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?

बुमराह-सिराजची जागा निश्चित!

आयपीएल २०२४ च्या हंगामानंतर जूनमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात होते. अशा स्थितीत संदीप तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची जागा घेऊ शकतो. संदीपशिवाय अर्शदीप सिंगच्या नावावरही निवडकर्ते विचार करू शकतात. मात्र, त्याने आतापर्यंत आयपीएल २०२४ मध्ये फारशी छाप पाडलेली नाही. तर निवडकर्ते भुवनेश्वर कुमारच्या नावावर क्वचितच विचार करतील.

हेही वाचा – IPL 2024: हार्दिकची मिसफिल्डिंग; तुषारा असा झाला व्यक्त, VIDEO होतोय व्हायरल

मुंबईविरुद्ध संदीप शर्माची शानदार गोलंदाजी –

सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ ४.५ च्या इकॉनॉमीने १८ धावा दिल्या आणि ५ विकेट्स घेतल्या. त्याने इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी यांना बाद केले. आयपीएल २०२४ मध्ये संदीपने आतापर्यंत ३ सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. या कालावधीत त्याने १२.६६ च्या सरासरीने आणि ६.९० च्या इकॉनॉमीने ६ विकेट्स घेतल्या आहेत.